'अजितदादा कोण? मग, बारामतीत जाऊन शेपूट का घालता'

Ajit Pawar Prabhakar Deshmukh
Ajit Pawar Prabhakar Deshmukhesakal
Summary

'फसवणूक करणाऱ्या या लबाडांचं नाटक माणदेशी जनताच बंद करेल.'

गोंदवले (सातारा) : ज्यांचा डीएनए व रक्तात काँग्रेस (Congress) आहे, असे म्हणणारे माणचे आमदार हे कधीच ना पक्षाशी ना जनतेशी प्रामाणिक राहणार नाहीत. स्व पक्षातही नेत्यांसह कार्यकर्त्यांना पिडा वाटू लागलेल्या आमदारांनी चालवलेले नासवानासवीचे नसते उद्योग आता लोकांनी ओळखलेत. अजितदादा (Ajit Pawar) कोण बोलता, तर मग बारामतीत (Baramati) जाऊन शेपूट का घालता, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख (NCP leader Prabhakar Deshmukh) यांनी आमदार जयकुमार गोरेंना (Jayakumar Gore) लगावला आहे. सांगली ते व्हाया मायणीमार्गे पनवेलपर्यंतच्या सर्व बाबी माझ्याकडे पुराव्यासह आहेत. त्या योग्य त्या वेळी सर्वांसमोर आणणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

पळशी (ता. माण) येथील सोसायटी निवडणुकीत राष्ट्रवादी व मित्र पक्षांनी दहा जागा जिकून सत्ता मिळविली. या संचालकांचा देशमुख यांच्या हस्ते सत्कार झाला. या वेळी उपसभापती नितीन राजगे, नगराध्यक्ष सागर पोळ, माजी सभापती श्रीराम पाटील, माजी उपसभापती तानाजी कट्टे, बाळासाहेब सावंत, नगरसेवक महेश जाधव व विशाल पोळ, दिलीप तुपे, सतीश मडके, डॉ. भास्कर गंबरे उपस्थित होते. नूतन संचालक मानसिंग खाडे, काका खाडे, सूर्यकांत खाडे, सुभाष खाडे, दिनकर नाकाडे, सूर्यकांत येवले, जनाबाई खाडे, यशवंत जळक, सुनील गंबरे, महादेव देवकुळे, तसेच स्वीकृत सदस्य श्रीरंग शेळके, तुकाराम भोजने यांचा सत्कार करण्यात आला.

Ajit Pawar Prabhakar Deshmukh
UP Election : योगी मंत्रिमंडळाचा 15 मार्चला होणार शपथविधी?

श्री. देशमुख म्हणाले, ‘‘दहिवडी व वडूज नगरपंचायतीमध्ये पराभव झाल्यानेच आमदार गोरेंचा तोल जाऊ लागल्याने ते आता काहीही बरळत आहेत. त्यांच्या सांगली ते व्हाया मायणीमार्गे पनवेलपर्यंतच्या सर्व बाबी माझ्याकडे पुराव्यासह आहेत. त्या योग्य त्या वेळी सर्वांसमोर आणणार आहे. बळजबरीने हिसकवलेल्या मायणी मेडिकल कॉलेज कसे ताब्यात घेतले. त्या माध्यमातून कोरोना काळात शासनाच्या योजनेतून गरिबांना सेवा देण्याऐवजी लुबाडणूक करण्यात आली. आरोग्य सेवेच्या नावाखाली चालवलेल्या धंद्याचे पितळ उघडे पडल्यानेच त्यांची या काळातील बिले अजूनही शासनांकडून मिळालेली नाहीत.’’

Ajit Pawar Prabhakar Deshmukh
5 राज्यांच्या निकालांचा थेट राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवर परिणाम!

उरमोडीचे पाणी हे सरकारचे पाणी आहे. ही कोणाची खासगी मालमत्ता नाही. टेंभूचे पाणी इतके दिवस न मिळण्याचे पाप हे आमदारांचे आहे. मुख्यमंत्र्यांच्या सगळ्यात जवळचे आमदार होता, मग का आणले नाही. फसवणूक करणाऱ्या या लबाडांचे नाटक माणदेशी जनताच बंद करेल, असेही त्यांनी नमूद केले. पुढील काळात पळशीतील लोकांनी मागणी केलेले दोन बंधारे बांधून शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यात मी राष्ट्रवादीच्या माध्यमातून सोडविणार आहे, असे आश्‍वासनही त्यांनी दिले. डॉ. राजेंद्र खाडे, केशव वणवे यांचीही भाषणे झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com