महान पुरुषामागे एक स्त्री असते, पण ती पत्नीच असते असं नाही; श्रीनिवास पाटलांच्या वक्तव्याने गाेंधळ

सिद्धार्थ लाटकर
Friday, 15 January 2021

साहेबांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या स्वीय सहाय्यकाने ई-सकाळशी बाेलताना सांगितले.

सातारा : सांगली जिल्ह्यातील औदुंबर येथील सदानंद साहित्य मंडळाच्या ७८ व्या साहित्य संमेलनास खासदार श्रीनिवास पाटील यांनी गुरुवारी उपस्थिती लावली. कवी सुधांशु तथा हनुमंत नरहर जोशी यांचे जन्मगाव औदुंबर येथे हे संमेलन भरविण्यात आले होते. प्रा.वैजनाथ महाजन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या संमेलनाला विविध ठिकाणच्या साहित्य रसिकांनी उपस्थिती नोंदवली.

या संमेलनात उपस्थितांसमाेर खासदार पाटलांनी खूमासदार भाषण केले. ते म्हणाले, प्रत्येक महान पुरुषामागे एक स्त्री असते, पण ती पत्नीच असते असं नाही. कुणीही गैरसमज करुन घेऊ नका. पण हेही खरं आहे असे खासदार पाटलांनी म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.

दरम्यान खासदार पाटील यांच्या या वक्तव्याचा काहींनी वेगळा अर्थ काढला. एका कार्यक्रमात व्यस्त असल्याने खासदार श्रीनिवास पाटील यांच्या स्वीय सहाय्यकांनी फाेन घेत साहेबांच्या बाेलण्याचा उद्देश काेणाकडे नव्हता. त्यांचे वक्तव्याचा काहींनी विपर्यास करुन दिशाभुल करण्याचा प्रयत्न केल्याचे ई-सकाळशी बाेलताना सांगितले. यशस्वी पुरुषामागे पत्नी व्यतरिक्त स्त्री म्हणजे आई, बहीण, मूलगी, मावशी देखील असू शकते ना असेही त्यांनी नमूद केले.

पहिले ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव पद्मविभूषणपासून उपेक्षितच!

सरपंचपद नकाे रे बाबा ! का आमच्या गावाला बदनाम करालायस ?

भारतीय हाॅकी संघातील मुलींचा युवा वर्गास संदेश; माेबाईलच्या चक्रव्हूयातून बाहेर पडा, मैदानात उतरा!
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP Leader Shrinivas Patil Comment On Succesfull Man Women Sangli Satara Marathi News