Video : प्लाझ्माच्या रुपाने जीवनदान देऊया : आमदार मकरंद पाटील

सिद्धार्थ लाटकर
Tuesday, 6 October 2020

प्लाझ्माच्या उपचार पद्धतीने गंभीर बाधितांवर उपचार केल्यास त्यांचे प्राण वाचू शकतात. 

सातारा : ऍन्टीबॉडीज प्लाझ्माच्या उपचार पद्धतीने गंभीर बाधितांवर उपचार केल्यास त्यांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या संख्येने प्लाझ्मा दान करावा, असे आवाहन वाई-खंडाळा-महाबळेश्‍वरचे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार मकरंद पाटील यांनी केले आहे.

कोरोना संसर्गाच्या काळातही आमदार मकरंद पाटील हे वाई, खंडाळा व महाबळेश्‍वर तालुक्‍यात सक्रिय होते. तीन तालुक्‍यातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात, कोरोनाबाधितांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी त्यांचा सातत्याने मतदारसंघात संपर्क राहिला. रोजच्या धावपळीमुळे त्यांना कोरोनाची काही लक्षणे जाणवली. त्यामुळे त्यांनी आपली अॅन्टिजेन तपासणी करून घेतली. या तपासणीत ते पॉझिटिव्ह आले हाेते. त्यानंतर ते पुढील उपचारासाठी पुणे येथे गेले हाेते.

Video : वाईत घुमला मराठा एकजुटीचा आवाज 

जिल्ह्यातील बरेच बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. या रुग्णांमध्ये कोरोना विषाणूपासून लढण्यासाठी ऍन्टीबॉडीज तयार झालेल्या असतात. या ऍन्टीबॉडीज प्लाझ्माच्या उपचार पद्धतीने गंभीर बाधितांवर उपचार केल्यास त्यांचे प्राण वाचू शकतात. नागरिकांनी मोठ्या संख्येने प्लाझ्मा दान करावा, असे आवाहन आमदार मकरंद पाटील यांनी करत मीही प्लाझ्मा दान करणार असल्याचेही नमूद केले. 

सेंट झेविअर्स सुरुच हाेती ? शिक्षण विभागाच्या अहवाल गुलदस्त्यात


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP MLA Makrand Patil Appeals Citizens Donate Plasma To Covid 19 Patients Satara News