राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटलांना कोरोनाची लागण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटलांना कोरोनाची लागण

यापूर्वी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, त्यानंतर पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जावळीचे नेते दीपक पवार यांच्यानंतर आता राष्ट्रवादीचे वाईचे आमदार मकरंद पाटील कोरोनाबाधित झाले आहेत.

राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटलांना कोरोनाची लागण

सातारा : वाई-खंडाळा-महाबळेश्‍वरचे राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आज (ता. ३१) त्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ते उपचारासाठी पुणे येथे जाणार आहेत. त्यांच्या निकट सहवासित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही आपली तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा बॅंकेचे संचालक नितीन पाटील यांनी केले आहे. 

कोरोना संसर्गाच्या काळातही आमदार मकरंद पाटील हे वाई, खंडाळा व महाबळेश्‍वर तालुक्‍यात सक्रिय होते. तीन तालुक्‍यातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात, कोरोनाबाधितांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी त्यांचा सातत्याने मतदारसंघात संपर्क आहे. रोजच्या धावपळीमुळे त्यांना कोरोनाची काही लक्षणे जाणवू लागली. त्यामुळे त्यांनी आपली अॅन्टिजेन तपासणी करून घेतली. या तपासणीत ते पॉझिटिव्ह आले. त्यामुळे त्यांनी जिल्हा रूग्णालयात जाऊन आरटीपीसीआर चाचणी करून घेतली. त्यामध्येही त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ते उपचारासाठी पुणे येथे जाणार आहेत.

गुड न्यूज! कोरोनाकाळात केंद्राचा ग्रामपंचायतींना मोठा दिलासा; खात्यावर तब्बल 45 कोटींचा निधी जमा

यापूर्वी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, त्यानंतर पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जावळीचे नेते दीपक पवार यांच्यानंतर आता राष्ट्रवादीचे वाईचे आमदार मकरंद पाटील कोरोनाबाधित झाले आहेत. त्यामुळे श्री. पाटील यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी, तसेच काही लक्षणे आढळल्यास चार ते पाच दिवस होम क्वारंटाईन व्हावे, असे आवाहन जिल्हा बॅंकेचे संचालक व आमदार मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांनी केले आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Web Title: Ncp Mla Makrand Patil Tested Corona Positive

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top