'काहीही संबंध नसताना केंद्राला 'ते' पत्र मी कसा देईन?'

Shashikant Shinde
Shashikant Shindeesakal
Summary

आरोप करणाऱ्या विद्वानांना या दोन चेंबरची माहिती तरी आहे का?

कोरेगाव (सातारा) : 'जिहे-कटापूर योजना (Jihe-Katapur scheme), कृष्णा खोरे महामंडळ राज्य सरकारचे, जलसंपदा मंत्रिपदाच्या माझ्या कार्यकाळात मीही या योजनेला निधी मंजूर केला. असे असताना केंद्राचा काहीही संबंध नसताना ही योजना बंद करण्याचे पत्र मी केंद्राला कसा देईन, हे विद्वानांना कोण समजावणार?' अशा शब्दांत आमदार शशिकांत शिंदे (MLA Shashikant Shinde) यांनी आमदार महेश शिंदे (MLA Mahesh Shinde) यांचा नामोल्लेख टाळून त्यांच्या आरोपांना उत्तर दिले.

जिहे-कटापूर योजनेच्या वर्धनगड बोगद्याजवळील चेंबरमधून रामोशीवाडी (ता. कोरेगाव) येथील तलावात सोडलेल्या पाण्याचे पूजन आमदार शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी तानाजीराव मदने, सभापती राजाभाऊ जगदाळे, शिवाजीराव महाडिक, राजेंद्र भोसले, श्रीमंत स. झांजुर्णे, अरुण माने, अॅड. पांडुरंग भोसले, प्रताप कुमुकले, श्रीमंत नि. झांजुर्णे, भास्कर कदम, नाना भिलारे, अजय कदम, विजयराव चव्हाण आदी प्रमुख उपस्थित होते. आमदार शिंदे म्हणाले, "कायम पाण्याचा टँकर पाहिलेल्या रामोशीवाडी, भाटमवाडी, शेल्टी खिरखिंडीसह या परिसरातील गावांच्या वतीने या भागातील ज्येष्ठ नेते तानाजीराव मदने व त्यांच्या सहकाऱ्यांनी या समस्येवर तोडगा काढण्याची विनंती माझ्याकडे केली होती.

Shashikant Shinde
काँग्रेस-राष्ट्रवादीला धक्का; 'शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवणार'

खटाव, माणपर्यंत योजनेचे पाणी वाटप झाले होते; परंतु कोरेगावचा समावेश नव्हता. ज्या भागातून या योजनेचे पाणी पुढं जाणार आहे, तो भाग वंचित राहू नये म्हणून मी भूमिका मांडली. घोगरे यांच्यासारख्या अधिकाऱ्यांनी माणुसकीच्या चौकटीतून सहकार्य केले. अजित पवार यांच्यापुढे मी हा प्रस्ताव ठेवल्यानंतर त्यांनी रामोशीवाडी व भाटमवाडी, अशा दोन ठिकाणच्या चेंबरसाठी मंजुरी मिळाली. आरोप करणाऱ्या विद्वानांना या दोन चेंबरची माहिती तरी आहे का? या भागातील तलावामध्ये आज पाणी पोचल्यावर मदनेतात्या भावुक झाले. या कामाचे खरे श्रेय त्यांनाच आहे. त्यांच्या पिढीने टँकर, दुष्काळ पाहिला, नव्या पिढीने ही जाणीव ठेवून राष्ट्रवादीच्या पाठीशी राहावे. चारमाही असलेली ही योजना बारमाही होईपर्यंत आपली पाण्यासाठीची लढाई सुरूच राहील."

Shashikant Shinde
उदयनराजेंना दिवाळीचा 'गोडवा' हवा, की आणखी काही : शिवेंद्रसिंहराजे

पाणी वाटपाच्या यादीत सध्या चिमणगावचे नाव नाही; परंतु या गावाचाही पाणी प्रश्न जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमातून शंभर टक्के सोडवला जाईल, असेही त्यांनी सांगितले. तानाजीराव मदने म्हणाले, "आमच्या शिवारात 'कृष्णा' येईल, असे स्वप्नातही वाटले नव्हते; परंतु शशिकांत शिंदे यांच्या अथक परिश्रमाने आज हे स्वप्न साकार झाले. याप्रश्नी त्यांनी पहिली बैठक तत्कालीन जलसंपदामंत्री रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यासमवेत घडवून आणली होती. त्यानंतर ते स्वतः या विभागाचे मंत्री झाले आणि हे अवघड काम त्यांनी पूर्ण केले. कोणी त्रयस्थांनी जलपूजन करण्याअगोदर आपण जलपूजन करायला हवे, असा आमचा आग्रह असल्याने आजच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे."

Shashikant Shinde
Political : फार्म हाऊसवर ठरला 'मास्टर प्लान'; भाजप-राष्ट्रवादीच्या नेत्यांत खलबत्तं

'सोळशी'च्या पाठपुराव्याची गरज

सोळशी धरण झाल्यास सर्व दुष्काळी तालुके ओलिताखाली येतील. त्यामुळे कोरेगावसह जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांसाठी सोळशी धरणाचा पाठपुरावा करण्याची अत्यंत गरज असल्याचे आमदार शशिकांत शिंदे यांनी या वेळी सांगितले.

Shashikant Shinde
शिवसेनचं ठरलं! 'आता हार तुरे घेऊन मागे पुढे करणाऱ्याला तिकीट नाही'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com