

NCP workers burn effigy of Rutuja Shinde in Wai, intensify protest demanding resignation.
sakal
वाई शहर: जिल्हा परिषदेच्या सभापती निवडीप्रसंगी राष्ट्रवादी सदस्या ऋतुजा शिंदे यांनी बंडखोरी केली. त्यांनी भाजपला पाठिंबा देत महिला व बालकल्याण समितीचे सभापती पद मिळवले. या विरोधात बावधन गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत शिंदेंच्या घरावर आज मोर्चा काढला.