

Blow to NCP (SP): Pisal Family from Bavdhan Switches Sides to BJP
Sakal
बावधन : माजी मंत्री (कै.) मदनराव पिसाळ यांच्या कुटुंबातील जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती शशिकांत पिसाळ, माजी अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ, विजयसिंह पिसाळ, दीप्ती पिसाळ, बाळासाहेब पिसाळ यांच्यासह वाई तालुक्यातील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काल ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत बावधनमध्ये झालेल्या कार्यक्रमात भाजपात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासाठी हा धक्का मानला जात आहे.