esakal | निवडणुकीत राष्ट्रवादीला सर्वाधिक मतं मिळणार; भाजपची भूमिका ठरणार 'निर्णायक'
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Bank election

राष्ट्रवादी काँग्रेसकडे सर्वाधिक मते असल्याने ते जो उमेदवार देतील, तो बिनविरोध निवडून येणार आहे.

निवडणुकीत राष्ट्रवादीला सर्वाधिक मतं मिळणार

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : खरेदी-विक्री मतदारसंघातून आजपर्यंत अनेक दिग्गज नेत्यांनी संचालक होऊन जिल्हा बॅंकेचे (Satara Bank Election 2021) प्रतिनिधित्व केलेले आहे. यावेळेस आमदार मकरंद पाटील (MLA Makarand Patil) हे पुन्हा इच्छुक आहेत. ११ ठरावांच्या माध्यमातून पुन्हा एकदा या मतदारसंघातून बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पण, आमदार शशिकांत शिंदे (MLA Shashikant Shinde) यांचाही या मतदारसंघातून ठराव असून, जावळीतील गणिते न जुळल्यास ते याही मतदारसंघाचा विचार करू शकतात. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (MLA Shivendrasinharaje Bhosale) यांच्याकडे या मतदारसंघातील दोन मते असून, ते कोणाच्या पारड्यात मते टाकणार, यावर ‘बिनविरोध’ची गणिते अवलंबून आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडे (Nationalist Congress Party) सर्वाधिक मते असल्याने ते जो उमेदवार देतील, तो बिनविरोध निवडून येणार आहे.

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत खरेदी-विक्री मतदारसंघाची निवडणूक यावेळेस थोडी लक्षवेधी होण्याची चिन्हे आहेत. यापूर्वी (कै.) लक्ष्मणराव पाटील हे या मतदारसंघातून बिनविरोध संचालक झाले होते. त्यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव आमदार मकरंद पाटील यांना संचालक म्हणून घेण्यात आले. आता यावेळेसही मकरंद पाटील यांचाही याच मतदारसंघातून सातारा जिल्हा खरेदी-विक्री संघातून ठराव करण्यात आलेला आहे. तसेच त्यांचे दुसरे बंधू व विद्यमान संचालक नितीन पाटील यांचाही वाई तालुका खरेदी-विक्री संघातून ठराव केलेला आहे. त्यामुळे दोघांपैकी एकाला यातून संधी आहे. पण, यावेळेस ११ ठरावांपैकी दोन ठराव हे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मानणारे आहेत. यामध्ये सातारा तालुका खरेदी-विक्री संघातून राजू भोसले, फलटण तालुका खरेदी-विक्री संघातून शिवरुपराजे निंबाळकर यांच्या ठरावांचा समावेश आहे. तर एक ठराव हा ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या नावाचा कऱ्हाड तालुका खरेदी-विक्री संघातून आहे. या व्यतिरिक्त खटावमधून प्रभाकर घार्गे, माणमधून मनोज पोळ, खंडाळ्यातून श्री. साळुंखे, पाटणमधून विक्रमसिंह पाटणकर, जावळीतून सौरभ शिंदे असे ११ ठराव आहेत.

हेही वाचा: 1942 च्या ब्रिटिशकालीन तुरुंगात आजही भरते झेडपीची 'शाळा'

यावेळेस आमदार शशिकांत शिंदे हे जावळी सोसायटी मतदारसंघातून संचालक होणार आहेत. पण, त्यांना तेथून अडविण्याची रणनीती आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी आखली आहे. पर्यायाने त्यांनी पुन्हा एकदा जावळीत लक्ष घातले आहे. जावळीतील गणिते जुळली नाहीत तर त्यांच्यापुढे खरेदी-विक्री संघ मतदारसंघातून संचालक होण्याचा पर्याय आहे. मागील काळात आमदार शशिकांत शिंदे विरुद्ध ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्यात याच मतदारसंघातून लढत झाली होती. यामध्ये शशिकांत शिंदेंचा ॲड. पाटील यांनी पराभव केला होता. त्यामुळे यावेळेसही खरेदी-विक्री मतदारसंघातून ॲड. उदयसिंह पाटील हेही आपले नशीब आजमावू शकतात. पण, सध्यातरी आमदार मकरंद पाटील यांच्याच नावाची चर्चा असून, ते बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या सर्वसमावेशक बैठकीनंतरच ते स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा: ब्रिटिशांनी निर्दयीपणे छातीवर गोळ्या झाडल्या अन् काँग्रेस आक्रमक झाली!

खरेदी-विक्री मतदारसंघातून झालेले संचालक

मुगुटराव रा. भोईटे, शिवाजीराव दौ. देसाई, के. के. थोरात, विठ्ठलराव गायकवाड, बकाजीराव पाटील, ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, विश्वासराव रा. निंबाळकर, (कै.) लक्ष्मणराव पाटील, आमदार मकरंद पाटील.

loading image
go to top