Video : गावचा सुपुत्र शिकवतोय पुरातून सहीसलामत कसे बाहेर पडावे; काेठे वाचा

अतुल वाघ
रविवार, 2 ऑगस्ट 2020

एनडीआरएफचे एक अधिकारी आणि 21 जवानांचे पथक कऱ्हाडला दाखल झाले आहे. त्यांच्यामार्फत आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.

तांबवे (जि.सातारा) ः संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तालुक्‍यातील दर वेळी पूरबाधित होणाऱ्या कोयना नदीकाठच्या तांबवे या गावी एनडीआरएफ जवानांच्या पथकाने नुकतीच ग्रामस्थांत जनजागृती केली. या वेळी जवानांनी प्रात्यक्षिक दाखवून लोकांना पुरापासून बचाव करण्यासाठी काय उपाययोजना कराव्या, याचे प्रात्यक्षिकही दाखवले. त्यास तांबवेतील युवकांनी चांगला प्रतिसाद दिला.
शासकीय कर्मचाऱ्यांनो खिसा रिकामा झालाय, मग हे वाचा
 
कोयना नदीकाठी वसलेल्या तांबवे गावाला पूर काळात चारी बाजूने पाण्याचा वेढा असतो. त्या वेळी आबालवृद्धांना बोटीतून बाहेर पडण्याशिवाय पर्यायच उरत नाही. मागील वर्षी वेळेत बोट उपलब्ध न झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली होती. त्याची दखल घेऊन प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास ताम्हाने यांच्याकडून आपत्ती काळात मदतकार्यासाठी एनडीआरएफचे पथक आणि बोट मागवल्या.

मुंबई पालिकेची मोठी कारवाई, माहिममधल्या 'या' रुग्णालयाची नोंदणी रद्द

त्याला यश आले असून, एनडीआरएफचे एक अधिकारी आणि 21 जवानांचे पथक कऱ्हाडला दाखल झाले आहे. त्यांच्यामार्फत आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून येथील कोयना नदीमध्ये पुरापासून बचावासाठी काय उपाययोजना कराव्या, पुरातून सहीसलामत कसे बाहेर पडावे यासह अन्य प्रात्यक्षिकाद्वारे त्यांनी जनजागृती केली. त्याला तांबवेतील युवकांनी चांगला प्रतिसाद दिला. जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, सरपंच जावेद मुल्ला, उपसरपंच धनंजय ताटे, ग्रामविकास अधिकारी टी. एल. चव्हाण, तलाठी विशाल बाबर, ग्रामपंचायतीचे कर्मचारी यांच्यासह ग्रामस्थ, तरुण उपस्थित होते. 

Video : असे झाल्यास पूरस्थितीत एनडीआरएफच्या टीमची वाट पाहायची वेळ येणार नाही : खासदार श्रीनिवास पाटील 

गावचा सुपुत्र देतोय प्रशिक्षण 

उत्तर तांबवे गावचा सुपुत्र अभिजित पवार हा सैन्य दलात आसामच्या नागालॅंडमध्ये कार्यरत आहे. नुकतीच त्याची एनडीआरएफमध्ये बदली झाली आहे. तो आपत्ती व्यवस्थापनासाठी नेमलेल्या पथकातून योगायोगाने तो सातारा जिल्ह्यातील टीमसोबत आला आहे. त्यामध्ये त्याला कऱ्हाड तालुका मिळाला. त्याअंतर्गत त्याने तांबवे गावातील तरुणांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले. अभिजित यांना याचे समाधान असून, गावकऱ्यांनी त्यांचा व त्यांच्या सहकाऱ्यांचा यथोचित सन्मान केला.

Edited By : Siddharth Latkar
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NDRF Is Training Residents Of Tambave In Satara District