
लोणंद : नीरा (ता. पुरंदर, जि. पुणे) येथे दुचाकींवर भगवे झेंडे लावून, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषणा देत आलेल्या १० ते १५ जणांनी आपणास दमदाटी, शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याचे ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी आज लोणंद येथे ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.