ब्रेकिंग न्यूज : साताऱ्यातील सिव्हिलला मिळाला कारभारी, डॉ. गडीकरांचे काय झाले वाचा

सिद्धार्थ लाटकर
Wednesday, 12 August 2020

केवळ सीव्हील सर्जनची बदली करुन थांबणार नाही तर जे जे आवश्यक आहे ते करुन सीव्हीलचा हॉस्पीटलचा कारभार आम्ही नक्कीच सुधारु, अशी ग्वाहीही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली हाेती.
 

सातारा : सातारा जिल्ह्याचे शल्यचिकीत्सक डाॅ. अामाेद गडीकर यांनी सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलेले आहे. त्यांच्या जागी डाॅ. सुभाष जयसिंग चव्हाण यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार साेपाविण्यात आला आहे. याबाबतचा आदेश आराेग्य विभगाचे उपसंचालक डाॅ. हेमंतकुमार बाेरसे यांना काढला आहे. दरम्यान या आदेशानूसार डाॅ. चव्हाण यांना ग्रामीण रुग्णालय पाली (जि.रत्नागिरी) येथून कार्यमुक्त करण्यात आले आहे.
जिलेबीचा गोडवा, कोरोनामुळे कडवा...  

सातारा व कोल्हापुर जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जेष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत रविवारी (ता.9) कराड येथे बैठक झाली हाेती. या बैठकीस पालकमंत्री बाळासाहेब पाटील, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, खासदार श्रीनिवास पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई, गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर, यांच्यासह खासदार, आमदार उपस्थित होते.

जगी ज्यास कोणी नाही, त्यास देव आहे.., वाचा 'तिच्या' विषयी 

या बैठकीपुर्वी मंत्र्यांसमाेर साताऱ्यातील सीव्हील हॉस्पीटलसंदर्भातल्या तक्रारींचा पाढा बहुतांश लाेकप्रतिनिधींनी वाचला हाेता. शासकीय हॉस्पीटललाच दुरुस्ती करण्याची गरज आहे, असे पालकमंत्री यांच्यासह अन्य लोकप्रतिनीधींनी मागणी केली हाेती. त्याचाच एक भाग म्हणुन तक्रारींचा विचार करुन सिव्हील सर्जनची काही तासातच बदली करण्याचा निर्णय़ मंत्री टाेपे यांनी जाहीर केला. केवळ सीव्हील सर्जनची बदली करुन थांबणार नाही तर जे जे आवश्यक आहे ते करुन सीव्हीलचा हॉस्पीटलचा कारभार आम्ही नक्कीच सुधारु, अशी ग्वाहीही आरोग्य मंत्री टोपे यांनी दिली हाेती.

आरोग्य विभागाच्या रिक्त जागांचा 'हा' महत्वपूर्ण निर्णय

दरम्यान आज जिल्हा शल्यचिकीत्सक डाॅ. आमाेद गडीकर यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. ग्रामीण रुग्णालय पाली (जि.रत्नागिरी) येथील वैद्यकीय अधिक्षक डाॅ. सुभाष चव्हाण यांच्याकडे सातारा जिल्हा शल्यचिकित्सक या पदाचा अतिरिक्त कार्यभार साेपविण्यात आला आहे. त्यादृष्टीने त्यांना पाली (जि. रत्नागिरी) येथून कार्यमुक्त करण्याचा आदेशही काढण्यात आला आहे.

...म्हणून मुख्याधिकारीपदी अभिजित बापट पुन्हा साताऱ्याला मिळाले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New Appointment Of Civil Surgeon Satara