करंजे, गोडोलीसह काेणता भाग सातारा शहराच्या हद्दीत आला जाणून घ्या

प्रवीण जाधव
Tuesday, 8 September 2020

शासनाची अधिसूचना आल्यानंतर हद्दवाढीत आवश्‍यक असणारी प्रक्रिया राबविण्यास सुरवात करण्यात येईल अशी माहिती मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी दिली. 
 

सातारा : सातारा शहराची हद्दवाढ झाल्याची अधिसूचना आज (मंगळवारी) मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांच्याकडे सुपुर्द केली. या अधिसूचनेत सातारा शहरात काेणता भाग समाविष्ट हाेणार याची इत्यंभूत माहिती उपलब्ध आहे.

सातारा शहरातील हद्दवाढीमध्ये गडकर आळी, भैरोबा पायथा, शाहूपुरी व लगतच्या कॉलनी, माजगावकर माळ व परिसर, करंजे ग्रामीण, रानमळा, दौलतनगर व परिसर, कदम बाग परिसर, जरंडेश्‍वर नाक्‍याकडे रस्त्याची डावी बाजू, विसावा नाका, विसावा कॅम्प, पिरवाडी, यशवंत कॉलनी, तलाठी कॉलनी, फॉरेस्ट कॉलनी, गोडोली तळ्यापासून अजंठा हॉटेलपर्यंतचा भाग, गोळीबार मैदान.

सातारच्या इतिहासात आठ सप्टेंबरला विशेष महत्त्व; जाणून घ्या कारण

याबराेबरच सहजीवन सोसायटी, कोयना-सन्मित्र सोसायटी, पारशी विहीर, कारंजकरनगर, राधिकानगर, डॉ. बापूजी साळुंखेनगर, इंदिरानगर झोपडपट्टी, गोडोली ग्रामीण, संपूर्ण शाहूनगर, मोरे कॉलनी, केसकर कॉलनी, महादरे व समाधीचा माळ या भागाचा समावेश आहे.

सत्तेत नसतानाही करुन दाखवलं, आता पुढची रणनीतीही ठरली : शिवेंद्रसिंहराजे

किल्ले अजिंक्‍यतारा पूर्वी पालिकेच्या हद्दीबाहेर होता. आता संपूर्ण किल्ला, तसेच महादरे गावचा यवतेश्‍वर डोंगराच्या हद्दीपर्यंत सर्व भाग हा पालिका हद्दीतील क्षेत्र समजले जाणार आहे. हद्दवाढीच्या निर्णयाचे सातारकरांनी आज स्वागत केले. माेती चाैक येथे नगरविकास आघाडीच्या नगरसेवक, नगरसेविकांनी नागरिकांना कंदी पेढे वाटून हद्दवाढीची माहिती दिली. 

या असणार चतु:सीमा 

  • उत्तरेस : करंजे गावचा संपूर्ण भाग वेण्णा नदीपर्यंत 
  • पूर्वेस : राष्ट्रीय महामार्गाच्या पश्‍चिमेकडील गोडोली व खेड, कोडोलीमधील काही भाग. 
  • दक्षिणेस : गोडोलीचा राष्ट्रीय महामार्गाच्या पश्‍मिचेकडील संपूर्ण भाग (अजिंक्‍यतारा किल्ल्यासह). 
  • पश्‍चिमेस : दरे खुर्द, क्षेत्र यवतेश्‍वर किल्ला पायथ्यापर्यंत.
  •  

शिवेंद्रसिंहराजे अजित पवारांना भेटले; साताऱ्याची हद्दवाढ घेऊन आले

पालिकेत नव्याने समाविष्ट होणाऱ्या भागात पालिकेला लगेच कर घेता येणार नाही. शासनाच्या नियमानुसार तेथे सुविधा पुरवाव्या लागतात. त्यानंतर पाच वर्षांत नव्या भागात टप्प्याटप्प्याने कर वाढवले जातील. शासनाची अधिसूचना आल्यानंतर हद्दवाढीत आवश्‍यक असणारी प्रक्रिया राबविण्यास सुरवात करण्यात येईल अशी माहिती मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी दिली. 

खवले मांजर नेमकं आहे तरी काय? मोठ्या प्रमाणावर तस्करी का केली जाते? जाणून घ्या नेमकं कारण

Edited By : Siddharth Latkar 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New Areas Covered In Satara Muncipal Council Satara News