

Inclusive Literature Initiative Opens New Doors for the Blind
sakal
-प्रशांत घाडगे
छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरी (सातारा) : वाचनाची आवड असूनही प्रत्यक्ष पुस्तक वाचनातील अडथळ्यांमुळे आतापर्यंत अंध विद्यार्थ्यांना साहित्यविश्वापासून दूर राहावे लागत होते. मात्र, या अडचणींवर मात करत साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर प्रथमच ब्रेल लिपीतून पुस्तकांचे प्रकाशन झाल्याने अंध मुलांसाठी वाचनाचे नवे दालन खुले झाले आहे. अंध मुलांच्या वाचनातील अडचणी दूर करण्याच्या दृष्टीने उचललेले हे पाऊल साहित्याबरोबर अंध व्यक्तींच्या आत्मविश्वासाला अन् सर्जनशीलतेला मिळालेली नवी दिशा ठरणार आहे.