

Government to Verify All E-Peek Entries Under Revised Transparency Rules
sakal
-हेमंत पवार
कऱ्हाड : पीक पाहणी प्रक्रियेत पारदर्शकता आणि अचूकता आणण्यासाठी महसूल विभागाने पाऊल उचलले आहे. नोंदीतून येणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी आणि त्यातील चुका पुन्हा होऊ नये, यासाठी आता ई पीक पाहणीअंतर्गत करण्यात आलेल्या नोंदीची पडताळणी करण्यात येणार आहे. सर्व नोंदीची पडताळणी झाल्यावरच पुढील कार्यवाही होणार आहे. त्यासाठी नवीन नियमावली तयार करण्यात आली असून, डिजिटल क्रॉप सर्व्हे प्रकल्पांतर्गत आता पीक नोंदणी तपासली जाणार आहे.