new year celeberation at kaas mahabaleshwar police guidelines

new year celeberation at kaas mahabaleshwar police guidelines

esakal

New Year at Kaas: एकतीस डिसेंबरच्या जल्लोषासाठी कास पठार-महाबळेश्वरला जाताय ? सावधान! जावलीत पोलिसांची करडी नजर....

31st December celebration at Mahabaleshwar Travel Guidelines: थर्टीफर्स्टच्या जल्लोषात पोलिसांची करडी नजर, पर्यटकांना सतर्कतेचा इशारा
Published on

थर्टीफर्स्टचा जल्लोष, नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी जावळी तालुक्यामध्ये पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पर्यटनाला कोणतेही गालबोट लागू नये, यासाठी मेढा पोलिस अलर्ट झाले आहेत. मेढा, कुडाळ, करहर, केळघर येथे मेढा पोलिसांचे विशेष फिरते पथक व नाकाबंदी करणार असून, वाहन व चालकांची कसून तपासणी पथक करणार आहे.

नाताळच्या सुटी लागल्यापासून ३१ डिसेंबरला या वर्षाला निरोप देण्यासाठी थर्टीफर्स्ट आणि २०२६ या नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटक ३१ डिसेंबरला रात्रभर जल्लोष करतात. या पार्श्र्वभूमीवर या दिवशी नागरिक मोठ्या प्रमाणात हॉटेल, रेस्टॉरंट, क्लब या ठिकाणी जाऊन अन्न पदार्थांचा आस्वाद घेत असतात. यानिमित्त अन्न पदार्थाच्या मागणीत वाढ होत असून, ग्राहकांना निकृष्ट दर्जाचे अन्न पदार्थ दिले जाऊ नये, यासाठी अन्न व औषध प्रशासन अधिकारी लक्ष ठेऊन आहेत.

सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे तितक्याच जल्लोषात स्वागत करण्यासाठी सर्व जण सज्ज झाले असताना पोलिसांनी कंबर कसली आहे. सध्या पोलिसांकडून हॉटेल, लॉज, कॉटेजचालक यांच्या बैठका घेतल्या जात आहेत. अमली पदार्थाची विक्री होत असल्यास तत्काळ माहिती देण्याचे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे.

मेढा पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेली सर्व पोलिस यंत्रणा कामाला लागली आहे. नाताळ आणि त्यानंतर नववर्षाच्या स्वागतासाठी येथील हॉटेल, लॉज, कॉटेजेस यांची शंभर टक्के बुकिंग १५ दिवसांपूर्वीच झाली आहे. राहण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाची ओळख पटल्याशिवाय परवानगी देऊ नये, अशा सूचना सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्याकडून देण्यात येत आहेत.

<div class="paragraphs"><p>new year celeberation at kaas mahabaleshwar police guidelines</p></div>
कास - वनक्षेत्रात प्रवेश कराल तर होणार कारवाई....

तालुक्यात येणाऱ्या प्रत्येकाला आधारकार्ड, ड्रायव्हिंग परवाना, वाहनांची कागदपत्रे बाळगणे आवश्यक आहे. थर्टी फस्टनिमित्त पर्यटक, व्यावसायिक जय्यत तयारी करत असताना ड्रग्ज तस्करही आपले जाळे विस्तारित आहेत. पूर्वी मर्यादित असलेला अमली पदार्थांचा व्यापार आता ग्रामीण भागात पसरत आहे. थर्टीफर्स्ट आनंद लुटण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. शांततेत तो सर्वांना उपभोगता आला पाहिजे, यासाठी सर्वत्र पोलिस मेहनत घेत आहेत.

<div class="paragraphs"><p>new year celeberation at kaas mahabaleshwar police guidelines</p></div>
Satara News: सलग सुट्यांमुळे पाचगणी-महाबळेश्वर हाऊसफुल्ल! पसरणी घाटात वाहनांच्या रांगा, हुल्लडबाजीमुळे वाहतूक कोंडी..

इग्ज सप्लाय रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर काम केले जात असून, कोणालाही याची माहिती मिळाल्यास पोलिसांकडे संपर्क साधण्याचे आवाहन केले जात आहे. चेकपोस्टवर नाकाबंदी केली जाणार आहे. जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येकाला यातील एकातरी चेकपोस्टवरून जावे लागेल, त्या ठिकाणी एक महिला कर्मचाऱ्यासह तीन कर्मचारी नेमले जाणार आहेत.
- सुधीर पाटील
सहाय्यक पोलिस निरीक्षक, मेढा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com