दहिवडी : जुगार खेळणाऱ्यांना न्यायालयाने ठोठावला हजारोंचा दंड

दहिवडी : जुगार खेळणाऱ्यांना न्यायालयाने ठोठावला हजारोंचा दंड
Updated on

दहिवडी : शहरात जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी नऊ जणांवर कारवाई केली. याबाबत मिळालेली माहिती अशी, येथील बाजार पटांगणाजवळ जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती गोपनीय सूत्रांकडून पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला असता दहिवडी-गोंदवले रस्त्यालगत असलेल्या शेतकरी कापड दुकानाच्या पाठीमागील मोकळ्या जागेत नऊ जण तीनपानी जुगार खेळताना आढळून आले. 

या छाप्यात 20 हजार 290 रुपये व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. येथील रामा जाधव, संजय ढगे, सतीश निंबाळकर, गणेश इदाते, गणेश विभूते, वडगाव येथील अशोक ओंबासे, संजय ओंबासे व नरवणे येथील अमोल देवकुळे यांना ताब्यात घेण्यात आले.

वारकरी संप्रदाय युवा मंचचा ठाकरे सरकारला इशारा; काय म्हणाले अक्षयमहाराज वाचा 

त्यांच्यावर जुगार कायदा तसेच महाराष्ट्र कोविड उपाययोजना 2020 कलम 11 प्रमाणे कारवाई करण्यात आली. या सर्वांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायाधीशांनी प्रत्येकी एक हजार 400 रुपये दंड ठोठावला. पोलिस उपअधीक्षक बी. बी. महामुनी व सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रमोद दीक्षित, सहायक पोलिस उपनिरीक्षक देवानंद तुपे, पोलिस शिपाई तान्हाजी ढाकरे, तुषार हांगे, असिफ नदाफ, सचिन वावरे यांनी कारवाई केली.

गावी जाणाऱ्या गणेशभक्तांनाे... तुमच्यासाठी टाेलमाफ, अट वाचा 

चले जाव मोर्चाच्या स्मृतिस्तंभास कऱ्हाडकरांचे अभिवादन

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com