esakal | ऑक्‍सिजनसाठी 'महावितरण'चा आधार, 'नायट्रोक्‍सिजन'ला दिला वाढीव वीज भार

बोलून बातमी शोधा

Power Supply

ऑक्‍सिजनसाठी 'महावितरण'चा आधार, 'नायट्रोक्‍सिजन'ला दिला वाढीव वीज भार

sakal_logo
By
गिरीश चव्हाण

सातारा : कोरोनामुळे प्रकृती गंभीर बनलेल्या रुग्णांची जीवनाची लढाई ऑक्‍सिजन सिलिंडरच्या भरवशावर सुरू असून, सध्याच्या स्थितीत या सिलिंडरचा सर्वत्र तुटवडा जाणवत आहे. हा तुटवडा दूर करण्यासाठी पुढाकार घेतलेल्या येथील के नायट्रोक्‍सिजन कंपनीला अवघ्या 14 तासांत वीज वितरणने वाढीव वीज भाराची जोडणी दिली. यामुळे त्या ठिकाणचे उत्पादन चार टनाने वाढले असून, त्याचा फायदा अत्यवस्थ रुग्णांवरील उपचारास होत आहे.

कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून, यापैकी काही रुग्णांची प्रकृती गंभीर बनत आहे. गंभीर रुग्णांना गरजेनुसार उपचारादरम्यान ऑक्‍सिजन पुरवठा करण्यात येतो. मागणी वाढल्याने ऑक्‍सिजनची सर्वत्र टंचाई निर्माण झाली आहे. टंचाई दूर करण्यासाठी येथील के नायट्रोक्‍सिजन कंपनीने पुढाकार घेत विस्ताराचे पाऊल उचलले. या कंपनीत दररोज 700 च्या आसपास ऑक्‍सिजन सिलिंडरचे उत्पादन होत असून, त्यासाठी 575 किलोवॉट इतका वीज भार वापरण्यात येतो. टंचाई दूर करण्यासाठी ऑक्‍सिजन उत्पादन वाढीचा निर्णय घेत कंपनीने 260 किलोवॉट क्षमतेच्या वाढीव वीज भारासाठी वीज वितरणकडे अर्ज केला. यानुसार कार्यवाही करण्यास सुमारे दहा दिवसांचा कालावधी अपेक्षित होता.

सातारकरांनाे! पालिकेने सुरक्षिततेसाठी घेतला तातडीने निर्णय

मात्र, एवढा वेळ लागणे धोकादायक असल्याने वीज वितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कामास प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला. याबाबत ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आदेश दिल्यानंतर वीज वितरणची यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाली. सर्व तांत्रिक कामे सलग 14 तास राबून पूर्ण करून के नायट्रॉक्‍सिजला वाढीव वीजभाराचा पुरवठा वीज वितरणने सुरू केला. सलग सुरू असणाऱ्या कामावर सातारा मंडलचे अधीक्षक अभियंता गौतम गायकवाड, उपकार्यकारी अभियंता अविनाश खुपसे, अधिकारी, कर्मचारी कार्यरत होते. वीज वितरणच्या तत्परतेमुळे ऑक्‍सिजनची टंचाई दूर होण्यास मदत झाली आहे.

Edited By : Balkrishna Madhale