

Karad Civic Administration Under Scrutiny as Monthly General Meetings Remain Pending
sakal
कऱ्हाड: पालिकेच्या कारभारात सर्वसाधारण मासिक सभा केवळ औपचारिकता नसून, धोरणात्मक निर्णय घेण्याचे व्यासपीठ आहे. मात्र, एप्रिलनंतर तब्बल पाच महिने एकही मासिक सभा न झाल्याने शहरातील विकासकामे, प्रशासकीय निर्णय आणि नागरिकांशी संबंधित अनेक प्रस्ताव रखडले आहेत. विशेष म्हणजे, सत्तेवर आल्यानंतर प्रत्येक महिन्याला नियमित सभा घेऊ, अशी ग्वाही देणाऱ्या सत्ताधाऱ्यांनाच त्यांच्या आश्वासनाचा सोयीस्कर विसर पडल्याचे वास्तव आहे.