खुशखबर! प्लाझ्मा थेरपीसाठी कृष्णा हॉस्पिटलला मान्यता; गंभीर कोरोनाबाधित रुग्णांचा जीव वाचण्यास होणार मदत

सचिन शिंदे
Wednesday, 16 September 2020

त्याचे अधिकृत पत्र अन्न व औषध प्रशासनाकडून हॉस्पिटलला प्राप्त झाले आहे.

कऱ्हाड : पश्‍चिम महाराष्ट्रात कोरोनामुक्तीच्या लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कृष्णा हॉस्पिटलला प्लाझ्मा थेरपीस मान्यता मिळाली आहे. त्या थेरपची मान्यता मिळालेले कृष्णा जिल्ह्यातील एकमेव हॉस्पिटल आहे. कोरोनामुक्त होऊन घरी परतलेल्या रुग्णांनी रक्तातील प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी केले आहे.
 
ते म्हणाले,"" कृष्णा हॉस्पिटल कोरोनाविरुद्धच्या लढाईत अग्रसेर आहे. पहिल्या विशेष कोरोना वॉर्डची निर्मिती, जिल्ह्यातील पहिली कोरोना चाचणी लॅब, कोरोना लस संशोधनात सहभागी अशी कामगिरी "कृष्णा'ने केली आहे. त्यांना प्लाझ्मा थेरपीस मान्यता मिळाली आहे. त्याचे अधिकृत पत्र अन्न व औषध प्रशासनाकडून हॉस्पिटलला प्राप्त झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी औषध निर्माण झालेले नाही. त्याच्या प्रतिबंधाची लसही संशोधनाच्या प्रतीक्षेत आहे.

कऱ्हाड : प्रसंगी जीवाची बाजी लावू

त्या पार्श्वभूमीवर कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी वेगवेगळ्या उपचार पद्धतीचा अवलंब केला जातो आहे. त्यात प्लाझ्मा थेरपी आशेचा किरण ठरत आहे. जिल्ह्यात कृष्णा हॉस्पिटलमध्ये गरजू रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीचा अवलंब केला जाणार आहे.''

विनामूल्य कोरोना सेंटर सामान्यांना उपयुक्त ठरेल : विक्रम पावसकर

Edited By : Siddharth Latkar 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now Plasma Therapy In Krishna Hospital Karad Satara News