
सातारा : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत १० वर्षे व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांची १४ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार शासन सेवेत समायोजन करण्यासाठी शासन निर्णय दिला होता; परंतु एक वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटला तरी शासन निर्णयाबाबत अंमलबजावणी न झाल्याने आज जिल्हा परिषद कार्यालयासमोर राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनआरएचएम) अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समितीच्या वतीने लक्षवेधी असहकार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रातील कामकाज ठप्प झाले होते.