
प्रवेशपत्राबाबत विद्यार्थ्यांना काही अडचणी असल्यास किंवा काही दुरुस्ती करावयाची असल्यास त्यांनी माध्यमिक शिक्षण विभागात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सातारा : राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी (एनटीएस) विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर प्रवेशपत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ही परीक्षा 13 डिसेंबरला होणार असून, जिल्ह्यातील 13 परीक्षा केंद्रांवर 445 शाळांमधील चार हजार 374 विद्यार्थी परीक्षा देणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.
राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी यंदा जिल्ह्यातील विद्यार्थीसंख्या जास्त आहे. तसेच राज्यात एकूण 337 केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार असून, राज्यस्तरावर एकूण आठ हजार 819 शाळा व एकूण 94 हजार 238 विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आलेली आहे. याचबरोबर राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in व http://nts.mscescholarshipexam.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
उदयनराजेंचे हे म्हणणे हास्यास्पद; शशिकांत शिंदेंचा टाेला
ही प्रवेशपत्रे विद्यार्थ्यांना शाळांमधून देण्याची जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची असणार आहे. प्रवेशपत्राबाबत विद्यार्थ्यांना काही अडचणी असल्यास किंवा काही दुरुस्ती करावयाची असल्यास त्यांनी संबंधित परीक्षा केंद्रसंचालक, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) किंवा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन माध्यमिक शिक्षण विभागाने केले आहे.
Edited By : Siddharth Latkar