आनंदाची बातमी! नर्सिंग पदवी अभ्यासक्रमास ‘आरोग्य विज्ञान’ची परवानगी; साताऱ्यात यंदापासून जिल्हा रुग्णालयात होणार सुरू
Boost to Medical Education in Satara: महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलद्वारे नर्सिंग व्यवसायाचे नियमन केले जाते; परंतु जिल्हा रुग्णालयांतर्गत नर्सिंगचा पदवी अभ्यासक्रम उपलब्ध नव्हता. या ठिकाणी नर्सिंगचा पदवी अभ्यासक्रम सुरू होण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांनी प्रयत्न सुरू केले होते.
Satara District Hospital to begin MUHS-approved nursing degree course from this academic year.Sakal
सातारा: जिल्हा रुग्णालयात नव्याने सुरू होणाऱ्या बीएस्सी सायन्स इन नर्सिंग या नर्सिंग विभागातील पदवीच्या अभ्यासक्रमाला महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने परवानगी दिली आहे. त्यामुळे यावर्षीपासून हा अभ्यासक्रम सुरू होणार आहे.