

Marathas Snatched OBC Rights, Says Laxman Hake Over Satara ZP Row
sakal
सातारा : जिल्हा परिषद अध्यक्षपद ओबीसीसाठी राखीव असतानाही ते प्रत्यक्षात ओबीसीला न मिळता प्रस्थापितांकडेच गेले. या प्रक्रियेत ओबीसीला डावलले असून, आता आमची ताकद दाखवण्याची वेळ आली आहे. आगामी निवडणुकांत आमदार-खासदारांनी मतांसाठी तांड्यावर यावे, मग आम्ही जशास-तसे उत्तर देऊ, असा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिला. दोन सप्टेंबरचा अध्यादेश बेकायदा असल्याचा दावा करत मराठा समाजाने ओबीसीचे हक्क हिरावल्याचा आरोपही त्यांनी केला.