One Arrested in Dhom Theft Case : गुन्हे प्रकटीकरण पथकाने सचिन नवघणे याला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याच्याकडून नवनाथ दत्त मंदिरातील चोरी केलेली रोख रक्कम सहा हजार रुपये ताब्यात घेतली.
वाई : धोम (ता. वाई) येथील नवनाथ दत्त मंदिरातील दानपेटी फोडून त्यामधील अंदाजे सहा हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केल्याप्रकरणी वाई पोलिसांनी एकास ताब्यात घेतले. सचिन आनंदा नवघणे (रा. टिटेघर, ता. भोर) असे संशयिताचे नाव आहे.