
सातारा : शहर परिसरातून दुचाकी चोरल्याप्रकरणी एकाला शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अटक केली आहे. युवराज आकोबा निकम (वय ५६, रा. पिंपोडे बुद्रुक, ता. कोरेगाव) असे त्याचे नाव आहे. तो वाढे फाटा येथून दुचाकीवरून जात असताना पोलिसांना दिसला. पाठलाग करून त्याला थांबविण्यात आले.