esakal | पाेपट पाळल्याने मालकास बसावे लागले पिंज-यात

बोलून बातमी शोधा

पाेपट पाळल्याने मालकास बसावे लागले पिंज-यात

वन्यपक्षी पोपट पाळलेला असल्यास तो वनविभाग महाबळेश्वर यांच्या कार्यालयात आणून जमा करावा, असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

पाेपट पाळल्याने मालकास बसावे लागले पिंज-यात
sakal_logo
By
अभिजीत खूरासणे

महाबळेश्वर (जि. सातारा) : येथील मधुसागर संस्थेच्या मागील बाजूस असलेल्या सुंदरव्हिला कॉटेज येथे वन्यपक्षी पोपट पिंजऱ्यामध्ये बंदिस्त करून ठेवल्याबाबतची माहिती वन विभागाला मिळाली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाच पोपटांस चार पिंजऱ्यांसह जप्त करून ताब्यात घेतले. या प्रकरणी रामचंद्र नाना उतेकर (रा. महाबळेश्वर) यांच्यावर नुकताच वन विभागाने गुन्हा दाखल केला

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून या पोपटांची तपासणी करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाने दिली. ही कारवाई सहाय वनसंरक्षक (वनीकरण) विजय गोसावी, वनक्षेत्रपाल दिलीप झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सहदेव भिसे, वनरक्षक दीपक सोरट, लिपिक अमित खोत, वनमजूर संतोष काळे यांनी पार पाडली. 

वन्यपक्षी पोपट पाळलेला असल्यास तो वनविभाग महाबळेश्वर यांच्या कार्यालयात आणून जमा करावा, असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

नगराध्यक्षांकडून लोकशाहीचा खून; अफजल सुतारांचा घणाघात

काळजी घ्या! परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे : रामराजे नाईक - निंबाळकर 

जिल्हा परिषद अध्यक्षांचा इशारा; Home Isolation मधील फिरणा-यांवर गुन्हे दाखल करा

सण साध्या पद्धतीने साजरा करा; जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन

Edited By : Siddharth Latkar