
केळघर (जि. सातारा) : महाबळेश्वरहून साताऱ्याकडे जाताना आंबेघर तर्फ मेढा (ता.जावळी) येथे रामजी बुवा मंदिराच्या जवळील पुलावरून वेण्णा नदीत कार कोसळून एका पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात कारमधील चार जण जखमी झाले आहेत.
औरंगाबाद येथून महाबळेश्वरला फिरायला आलेले युवक परत महाबळेश्वरहून बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सातारा दिशेने कारने (क्र. एमएच -20- सी एस 9787) चालले होते. त्यावेळी त्यांची कार केळघर-आंबेघर दरम्यानच्या वेण्णा नदीवरील पुलानजीक आली असता वाहनावरील चालकाचा ताबा सुटून नदीतील खडकावर कोसळली. यामध्ये वाहनचालक अमित जोशी (वय 42, रा. औरंगाबाद) यांचा जागीच मृत्यू झाला. अभिजित बाशिरे (वय 17), संकेत पाटील (वय 16), यशराज पाटील (वय 18), आविश शेडगे (वय 17, सर्व रा.औरंगाबाद) हे किरकोळ जखमी झाले आहेत अशी माहिती मेढा पाेलिसांनी दिली. अधिक तपास मेढा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल माने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
समाजहिताची कामे करीत गुण्यागोविंदाने नांदत आहे 30 जणांचे एकत्र कुटुंब!
दरम्यान, विटा-महाबळेश्वर या राज्यमार्गाच्या चारपदरीकरणाचे काम सध्या सुरू असून, महाबळेश्वर- मेढा-सातारा या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. अपघात झालेल्या परिसरात मातीचे ढीग आहेत. तसेच कामाच्या ठिकाणी फलक लावलेले नसल्यामुळे चालकांना रस्त्याचा अंदाज येत नसून त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. ठिकठिकाणी पडलेले मातीचे ढिगारे, एका बाजूने खोदलेला रस्ता यामुळे अपघातांचे प्रमाण या रस्त्यावर वाढू लागले आहे. हे काम अधिक गतीने पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने दक्ष राहून ठेकेदाराकडून हे काम लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी वाहनचालक व नागरिकांकडून करण्यात येत आहे.
हुतात्मा जवान सुजित किर्दत अमर रहे, चिंचणेरच्या सुपुत्रावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.