esakal | दुचाकी अपघातात पती ठार; पत्नी गंभीर जखमी

बोलून बातमी शोधा

दुचाकी अपघातात पती ठार; पत्नी गंभीर जखमी}

अपघाताची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी अपघाताची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

satara
दुचाकी अपघातात पती ठार; पत्नी गंभीर जखमी
sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड (जि. सातारा) : काले गावाजवळील डाळिंबाच्या बागेजवळ झालेल्या दुचाकी अपघातात एक जण ठार झाल्याची घटना नुकतीच घडली. आनंदा गणपती पाटील (वय 58 रा. काले, ता. कऱ्हाड) असे ठार झालेल्याचे नाव असून, त्यांच्या पत्नी अक्काताई आनंदा पाटील या गंभीर जखमी झाल्या असल्याची माहिती तालुका पोलिसांनी दिली.
 
पोलिसांची माहिती अशी -  आनंदा पाटील व त्यांच्या पत्नी अक्काताई या दुचाकीवरून कामासाठी निघाले होते. ते दुचाकीवरून काले येथील डाळिंबाच्या बागेजवळ त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. या अपघातात आनंदा पाटील हे जागीच ठार झाले. त्यांच्या पत्नी जखमी झाल्या. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

अपघाताची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते.

Video पाहा : आता काेल्हापूर, सांगलीही गृहराज्यमंत्र्यांचे टार्गेट 

कॉलर उडवणारे शांत बसलेले आहेत तर मिशीला पिळ मारणारे घरात

कऱ्हाड शहर अंधारात! वाखाण भागात खांबावरील 50 एलईडीची चोरी

पैसे दिले तरच काम होते असा शिरस्ताच तयार झाला...

Edited By : Siddharth Latkar