esakal | आठ वर्षाच्या मुलाला विष पाजून स्वत: आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पित्याला जन्मठेप
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

आठ वर्षाच्या मुलाला विष पाजून स्वत: आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पित्याला जन्मठेप

sakal_logo
By
प्रवीण जाधव

सातारा : कौटुंबिक कलहातून आठ वर्षांच्या मुलाला विष पाजून स्वत: आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पित्याला प्रमुख जिल्हा न्यायाधीश आर. डी. सावंत यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. शिवराज संतोष भिंगारे (वय 8 वर्षे) असे खून झालेल्या मुलाचे, तर संतोष लक्ष्मण भिंगारे (वय 35, सध्या रा. पाचवड ता. वाई मूळ रा. कडेगाव, जि. सांगली) असे शिक्षा मिळालेल्या पित्याचे नाव आहे. (One People From Pachwad Sentenced To Life Imprisonment Satara Crime News)

संतोष याचा वैशाली यांच्याशी विवाह झाला होता. त्यांना दोन मुले होती. पती-पत्नीमध्ये वारंवार वाद व्हायचे. त्यामुळे वैशाली मुलांसह माहेरी कडेगाव येथे राहात होती, तर संतोष पाचवड येथे राहात होता. मृत शिवराज हा कडेगाव येथील शाळेत जात होता. 4 मार्च 2017 ला संतोषने शिवराजच्या शाळेत जाऊन त्याचा ताबा घेतला. त्यानंतर त्याला भुईंजमध्ये आणले. तोपर्यंत शिक्षकांनी वैशाली भिंगारे यांना याबाबत माहिती दिली. तिने ही माहिती कडेगाव पोलिसांना दिली.

पुणे-बंगळूर महामार्गावर कोल्हापूरला निघालेल्या ऑक्सिजन टँकरला गळती; साताऱ्यात खळबळ

दरम्यान, भुईंजमध्ये आल्यावर त्याने शिवराजला विष पाजले. त्यानंतर स्वत: विष पिऊन याबाबत फोनवरून पत्नीला माहिती दिली. दोघांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 10 मार्च 2017 ला शिवराजचा मृत्यू झाला. याबाबत वैशाली यांनी भुईंज पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. भुईंज पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करून जिल्हा न्यायालयात दोषारोपत्र सादर केले. साक्षीदारांच्या साक्षी व सहायक सरकारी वकील ऍड. नितीन मुके यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधीश सावंत यांनी संतोषला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

One People From Pachwad Sentenced To Life Imprisonment Satara Crime News