नोकरीचे आमिष दाखवून अनेकांना गंडा; सरताळ्यातील एकाला अटक

नोकरीचे आमिष दाखवून अनेकांना गंडा; सरताळ्यातील एकाला अटक
Updated on

सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरीला आहे, टेंडर मिळवून देतो व पत्नीला नोकरीला लावतो, असे सांगून 44 हजार 200 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी सरताळे (ता. जावळी) येथील एकास अटक केली. तौसिफ दस्तगीर शेख असे त्याचे नाव आहे. 

सहायक पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी तक्रार निवारण दिन आयोजित केला होता. त्यामध्ये तौसिफ शेख याने फसवणूक केली असल्याची तक्रार बुधवार पेठेतील अमीन शेख यांनी दिली होती. "मी जिल्हाधिकारी कार्यालयात कामाला आहे, तुमच्या पत्नीला नोकरीस लावतो व तुम्हाला ब्लिचिंग पावडरचे टेंडर मिळवून देतो,' असे सांगून तौसिफने 44 हजार 200 रुपये घेतले. मात्र, पैसे घेऊनही काम केले नाही, असे तक्रारीत म्हटले होते. त्यानुसार दलाल यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर यांना तौसिफवर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या होत्या. 

शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून घेण्यात आला. त्यानंतर त्याला पकडण्यासाठी पथक तयार करण्यात आले. या पथकाने तौसिफला कुडाळ (ता. जावळी) येथून अटक केली. कारवाईत सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर, संदीप शितोळे, हवालदार लैलेश फडतरे, अमित माने, स्वप्नील कुंभार, ओंकार यादव, मोहन पवार सहभागी झाले होते. हवालदार आशिष कुमठेकर तपास करत आहेत. दरम्यान, तौसिफने अशाप्रकारे अनेकांची फसवणूक केली असल्याची माहिती पुढे आली आहे. ज्यांची फसवणूक झाली असेल, त्यांनी शाहूपुरी अथवा जवळच्या पोलिस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kas Plateau flower season September 2026
Mayani Farmers Intensify Protest Against Shaktipeeth Highway Vow To Protect Land And Plan March To Prantadhikari Office
Koyna Dam Crosses 100 TMC Milestone as Heavy Rains Increase Water Storage and Support Power Generation in Maharashtra
7 Maharashtra tourists stranded in Nepal
Marathi News Esakal
www.esakal.com