
सातारा : घरकुलाचे टप्पानिहाय बांधकाम झाल्यानंतर लाभार्थी किंवा ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडून कागदपत्रे पंचायत समितीत सादर केल्यानंतर हप्ता मागणीची प्रक्रिया केली जात होती. त्यानंतर ग्रामीण गृहनिर्माण अभियंतामार्फत बांधकामास प्रत्यक्ष भेटी देऊन जिओ टॅग केले जाते. या प्रक्रियेला विलंब होत असल्याने घरकुलांची कामे ठप्प होण्याचे प्रकार वाढले होते. ही प्रक्रिया सुलभ होण्यासाठी आता ग्रामीण आवास योजनेतील टप्पानिहाय घरकुल बांधकाम निधीची मागणी लाभार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे घरकुलास येणारे अनुदान कमी कालावधीत लाभार्थ्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.