मूग, उडीद खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु : मंत्री बाळासाहेब पाटील

उमेश बांबरे
Tuesday, 15 September 2020

केंद्र शासनाने प्रती क्विंटलप्रमाणे उडिदासाठी हमी भाव ६ हजार, मूग हमी भाव ७ हजार १९६ असा जाहीर केला आहे. चालू हंगामात मूग, उडिदाची आवक बाजारात सुरु झाली आहे. बाजारभाव हमीभावापेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी खरेदी केंद्र लवकरच सुरु करण्यात येणार आहेत, असे मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

सातारा : हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत हमी भावाने मूग व उडीद खरेदीसाठीची नोंदणी आजपासून (ता. १५) सुरु झाली आहे. शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर नोंदणी करावी, असे आवाहन पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले. 

मंत्री पाटील म्हणाले, की केंद्र शासनाने प्रती क्विंटलप्रमाणे उडिदासाठी हमी भाव ६ हजार, मूग हमी भाव ७ हजार १९६ असा जाहीर केला आहे. चालू हंगामात मूग, उडिदाची आवक बाजारात सुरु झाली आहे. बाजारभाव हमीभावापेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी खरेदी केंद्र लवकरच सुरु करण्यात येणार आहेत. खरेदी केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी आजपासून नोंदणी प्रक्रिया सुरु झाली आहे. 

राजं, आम्हाला काय बी नग.. फकस्त त्या पायरीवर आमचं नाव कोरण्याची अनुमती द्या!

नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना नोंदणीच्या क्रमवारीनुसार उडीद, मूग खरेदी केंद्रावर आणण्यासाठी एसएमएसद्वारे कळविण्यात येईल. ज्या केंद्रावर नोंदणी केली आहे त्याच केंद्रावर एसएमएस आल्यानंतरच शेतकऱ्यांनी शेतमाल घेऊन यावा. सर्व खरेदी ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. शेतकऱ्यांनी आपआपल्या तालुक्यातील खरेदी केंद्रावर नोंदणी करावी. नोंदणीसाठी आधारकार्डाची छायांकित प्रत आणि पिकाची नोंद असलेला सातबारा उतारा सादर करावा, तसेच शेतकऱ्यांनी मोबाईल नंबर खरेदी केंद्रावर नोंदवावा. केंद्र शासनाकडे हमीभावाने मूग, उडीद खरेदीच्या मान्यतेचा प्रस्ताव ३१ ऑगस्ट २०२० ला पाठविण्यात आला आहे. लवकरच मान्यता अपेक्षित आहे, असेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले. 
 
संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online Registration For Purchase Of Moog Started Satara News