आता कोरोना लशींचे दोन डोस घेणाऱ्यांनाच मिळणार यात्रेत प्रवेश

Corona Dose
Corona Doseesakal
Updated on
Summary

सध्या कोरोनाचा कहर कमी झाला असला, तरी दोन लशींचे डोस घेणाऱ्या स्थानिक नागरिकांना घरातून बाहेर पडू दिलं जाणार आहे.

उंब्रज (सातारा) : पाल येथील श्री खंडोबाची यात्रा (Khandoba Yatra Pal) १५ जानेवारीला आहे. त्या यात्रेत दोन लस घेणाऱ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे, अशी माहिती प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी येथे दिली. पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil), जिल्हाधिकारी शेखर सिंह (Shekhar Singh) यांच्या उपस्थितीत होणाऱ्या पुढील बैठकीत त्या निर्णयावर शिक्कामोर्तब होणार आहे.

पाल येथील खंडोबा-म्हाळसाकांत यांच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. तहसीलदार विजय पवार, देवस्थान ट्रस्टचे प्रमुख मानकरी देवराज पाटील, पोलिस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे (Shashikant Shinde), प्रादेशिक परिवहन अधिकारी तृप्ती पाटील, सहायक पोलिस निरीक्षक अजय गोरड, सरपंच जयश्री पाटील, उपसरपंच सुनील काळभोर उपस्थित होते. दिघे म्हणाले, ‘‘सध्याच्या स्थितीला कोरोनाचा कहर कमी झाला असला तरी दोन लशींचे डोस घेणाऱ्या स्थानिक नागरिकांना घरातून बाहेर पडू दिले जाणार आहे. ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभागाने योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना करत नदीपात्रात औषध फवारणी करावी.’’

Corona Dose
हिम्मत असेल तर समोरासमोर या; आमदार शिवेंद्रराजेंचं उदयनराजेंना थेट चॅलेंज

देवराज पाटील म्हणाले, ‘‘यात्रा कालावधीत प्रशासनाने कोरोना महामारीच्या अनुषंगाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून यात्रा पार पाडावी.’’ यात्रेच्या नियोजनाबाबत चर्चा झाली. यात्रा सामान्यांसह सर्व घटकांची आहे. वाळवंटातील नवीन पुलाच्या कामासाठी पालकमंत्री बाळासाहेब पाटील व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी तीन कोटी रुपये मंजूर केले आहेत, अशी माहिती देण्यात आली. यावेळी उपअधीक्षक रणजित पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी महावितरण, अन्न व औषध, बांधकाम, आरोग्य, पशुवैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी करावयाच्या कामांसह ग्रामस्थ, मानकऱ्यांनी सुचवलेल्या प्रत्येक कामाचे पालन करून कामे पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही देण्यात आली.

Corona Dose
'महाराजांचा अपमान कराल, तर खपवून घेणार नाही'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Satara Highway weekend traffic
Greater Flamingo sighting
Koyna Dam reservoir live storage report July 2026
Koyana Dam Water Release
Marathi News Esakal
www.esakal.com