सातारा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती पूर्ण ताकदीने उतरणार आहे. आम्ही गेल्या अडीच, तीन वर्षांत लोकाभिमुख विकासकामांतून सर्वसामान्यांना न्याय दिला आहे. विधानसभेतील पराभवामुळे विरोधकांची मानसिकता खचली आहे. त्यांची महाकन्फ्यूज आघाडी झाली आहे. यावेळेसही महायुती जिंकणार असल्याची खात्री विरोधकांना झाल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली.