esakal | गृहराज्यमंत्र्यांचा आदेश; अवैध धंदेवाल्यांच्या मुसक्या आवळल्या
sakal

बोलून बातमी शोधा

desai

गृहराज्यमंत्र्यांचा आदेश; अवैध धंदेवाल्यांच्या मुसक्या आवळल्या

sakal_logo
By
विलास माने ः सकाळ वृत्तसेवा

गृहराज्यमंत्र्यांचा आदेश; अवैध धंदेवाल्यांच्या मुसक्या आवळल्यामल्हारपेठ (सातारा) : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या आदेशानंतर आबदारवाडी हद्दीतील निसरे फाटा येथे मल्हारपेठ पोलिसांनी मटका अड्ड्यावर छापा टाकून रोख आठ हजार ७० व जुगाराचे साहित्य ताब्यात घेत तिघांवर गुन्हा दाखल केला. मल्हारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये येणाऱ्या आबदारवाडी-निसरे येथे मटका व्यवसाय व अवैध धंदे वाढत असल्याबाबत आबदारवाडी ग्रामपंचायतीने गृहराज्यमंत्री देसाई यांना लेखी निवेदन दिले होते.

हेही वाचा: चिखली फाट्यावर भीषण अपघात; रक्तबंबाळ महिलेला 'माई'मुळे जीवदान

त्यानंतर गृहराज्यमंत्री देसाई यांच्या आदेशानुसार मल्हारपेठ पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक उत्तम भापकर यांनी काल आबदारवाडी हद्दीतील निसरे फाटा येथे अवैधरित्या सुरू असणाऱ्या मटका धंद्यावर छापा टाकला. यामध्ये निसरे फाटा येथील दिलीप नाथाजी कदम (रा. मल्हारपेठ) हा मटका घेत असताना मिळून आला. त्याच्याकडून चार हजार ९७० रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले.

प्रकाश शंकर कांबळे (रा. मारुल हवेली) हा मटका घेत असताना मिळून आला. त्याच्याकडून दोन हजार ४३० रुपये तर राहुल तानाजी भिसे (रा.मल्हारपेठ) हा मटका घेत असल्याचे निदर्शनास आले. त्याच्याकडून ६७० रुपये व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. संबंधितांवर मल्हारपेठ पोलिस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. हवालदार के. व्ही. कांबळे, वैभव पवार, संदीप घोरपडे तपास करत आहेत.

loading image
go to top