सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या मृत्यूची कारणे वाचा

सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या मृत्यूची कारणे वाचा
Updated on

सातारा : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा 400 वर गाठायला आला आहे. प्रशासनाकडून केलेल्या विश्‍लेषणानुसार जास्त वयाबरोबरच पूर्वीच्या आजार असणाऱ्यांचा मृतांमध्ये अधिक समावेश आहे. त्यातही फुफ्फुसाचा आजार असणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असल्याचे व त्याखालोखाल उच्च रक्तदाब व मधुमेह असे दोन्ही आजार असलेल्यांची संख्या जास्त असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पूर्वीचे आजार असलेल्या ज्येष्ठांनी अधिक सावधानता बाळगणे गरजेचे आहे.
सामाजिक कार्यकर्त्या काेमल पवार यांचे निधन, युवा वर्गात हळहळ 

जिल्ह्यामध्ये कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज 500 ते सहाशे जण बाधित म्हणून समोर येत आहेत. येत्या चार-पाच दिवसांमध्ये जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 15 हजारांचा टप्पा ओलांडेल, अशी परिस्थिती आहे. बाधितांच्या संख्येबरोबरच गंभीर रुग्णांची संख्याही वाढत आहे. ज्याप्रमाणे बाधित झालेल्यांना बेडची उपलब्धता कोरोना केअर सेंटरमध्ये होण्यास अडचणी येत आहेत. त्याप्रमाणे रुग्ण गंभीर झाल्यास त्याला ऑक्‍सिजन तसेच व्हेंटिलेटरची सुविधा असलेले बेडही सध्या जिल्ह्यामध्ये उपलब्ध होत नाहीत. बेडसाठी रुग्णांना वणवण भटकावे लागत आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाची बाधा होऊ नये यासाठी नियमांचे पालन करत वैयक्तिक काळजी घेणे अत्यावश्‍यक आहे. जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत झालेल्या 264 कोरोना मृत्यूचा झालेल्या विश्‍लेषणानुसार वय व पूर्वीचे आजार हे महत्त्वाचे मुद्दे समोर आले आहेत. त्यातही पूर्वीच्या आजार असलेल्यांची परिस्थिती गंभीर होण्याचे प्रमाण अधिक आहे.

जिवाची पर्वा न करणारा कऱ्हाडचा 'गणेश' ठरला त्यांच्यासाठी विघ्नहर्ता

समोर आलेल्या तथ्यानुसार उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या 41 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामध्ये 26 पुरुष व 15 महिलांचा समावेश आहे. मधुमेहाचा आजार असलेल्या 28 पुरुष व दोन महिला अशा 30 जणांचा मृतांमध्ये समावेश आहे. हृदयाचा आजार असलेल्यांमध्ये सात पुरुष व सात महिला असा 14 जणांचा समावेश आहे. किडनी व अल्कोहोलिक लिव्हरचा आजार असलेल्या प्रत्येकी एकाचा मृतांमध्ये समावेश आहे. इतर आजार असलेल्या दोन पुरुषांचा मत्यू झाला आहे. तर, दोघांचा आत्महत्येमुळे मृत्यू झाला आहे. मृतांची सर्वाधिक संख्या ही फुफ्फुसाचे आजार असलेल्यांची आहे. अशा प्रकारचा आजार असलेल्या 72 पुरुष व 13 महिला अशा 85 जणांचा मृत्यू झाला आहे. त्या खालोखाल उच्च रक्तदाब व मधुमेह असे दोन्ही आजार असलेल्या नागरिकांची संख्या आहे. तशा 55 पुरुष व 13 महिला अशा 68 नागरिकांचा मृतांमध्ये समावेश आहे.

अखेर प्रशासनाने म्हसवडचे ते काेविड रुग्णालय केले बंद
 
शासन व प्रशासनही अगोदरपासूनच पूर्वीचे आजार असलेल्यांना काळजी घेण्याचे वारंवार आवाहन करत आहे. तरीही अनेक वृद्ध कोरोनाबाधित समोर येत आहेत. पूर्वीच्या आजार असलेल्यांचे मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आल्यामुळे प्रशासनानेही जिल्ह्यातील पूर्वीचे आजार असलेल्या नागरिकांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. तशी जिल्ह्यातील प्रत्येक घरातूनही पूर्वीचे आजार असलेल्या ज्येष्ठांची अधिक जबाबदारीने काळजी घेणे आवश्‍यक बनले आहे. 

ज्येष्ठांना पोचू शकते तरुणांपासून बाधा 

आजार असलेले बहुतांश नागरिक हे घरातच असतात. परंतु, घरातील बाहेर जाणाऱ्या तरुणांमार्फत त्यांच्यापर्यंत कोरोनाची बाधा पोचू शकते. त्यामुळे घरामध्येही ज्येष्ठ व पूर्वीचे आजार असलेल्या नागरिकांशी संपर्क टाळला पाहिजे. शक्‍य असल्यास त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध करून देणे, यासाठी प्रत्येक कुटुंबाने प्रयत्न करणे आवश्‍यक आहे.

पुढच्या वर्षी लवकर या...जयघोष... सातारा शहरातील मानाच्या गणपतींनी राखली परंपरा

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Cannot Speak or Walk, Yet Shivprasad Achieves 66% in SSC and Inspires Many
Virmade Fata on Pune-Bengaluru Highway Becomes Accident-Prone Zone
Government to Verify All E-Peek Entries Under Revised Transparency Rules
Simplicity and Memories: Mahadev Jankar Shares Emotional Moments with Shepherds
Marathi News Esakal
www.esakal.com