esakal | Satara : आमची निष्‍ठा फक्त ‘सुरुची’वर
sakal

बोलून बातमी शोधा

शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा : आमची निष्‍ठा फक्त ‘सुरुची’वर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. सर्वाधिक मते असलेले सातारा तालुक्याचे नेते आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपण सर्वसमावेशक पॅनेलमध्ये सहभागी होणार असल्याबद्दल त्यांनी तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेतली. या सर्वांनी आमची निष्‍ठा सुरुचीवर असून, तुम्ही घ्याल तो निर्णय आम्हाला मान्य असेल, असा शब्द दिला आहे. येत्या १७ ऑक्टोबर रोजी पुन्हा जिल्हा बॅंकेच्या तालुक्यातील सर्व मतदारांसोबत बैठक घेऊन आगामी रणनीती शिवेंद्रसिंहराजे ठरविणार आहेत.

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी गोपनीय बैठका सुरू आहेत. प्रत्येकजण आपापल्या मतदारसंघातील मतदारांशी संवाद साधून त्यांची भूमिका जाणून घेऊ लागला आहे. त्या पध्दतीनेच सातारा तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मतेही शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नुकतीच बैठक घेऊन जाणून घेतली. या बैठकीस सातारा तालुका, सातारा पालिकेचे नगरसेवक व पदाधिकारी, कोरेगाव व कऱ्हाड उत्तर मतदारसंघात समाविष्ट झालेल्या सातारा तालुक्यातील गावांतील आमदार समर्थक उपस्थित होते.

हेही वाचा: लोणंद, खंडाळ्यात आंतरराज्य टोळीतील चौघांना अटक

जिल्हा बॅंकेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वसमावेशक करणार आहे. त्यासाठी सर्वाधिक मते असलेल्या शिवेंद्रसिंहराजेंना सोबत घेऊन ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यानुसार राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. त्यानुसार सर्वांनी आमची निष्‍ठा सुरुचीवरच असून, तुम्ही घ्याल तो निर्णय आम्हाला मान्य असेल, असा शब्द या सर्वांनी त्यांना दिला आहे.

आता आगामी १७ ऑक्टोबरला पुन्हा एकदा सातारा तालुक्यातील जिल्हा बॅंकेच्या मतदारांची बैठक होणार आहे. त्यामध्ये मतदारांचेही म्हणणे शिवेंद्रसिंहराजे जाणून घेणार आहेत. त्यामुळे सातारा तालुक्यात खासदार उदयनराजे भोसले व राष्ट्रवादीचे नेते दीपक पवार यांनी शिवेंद्रसिंहराजेंविरोधात कोणतीही चाल चालली तरी आमदारांनी आधीच रणनीती ठरवून सर्वांपुढे आपली भूमिका मांडल्याने या सर्व चाली फोल ठरणार आहेत.

loading image
go to top