Satara दिव्यांगांच्‍या प्रगतीसाठी सर्वतोपरी मदत करू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

disabled Distribution Desai Yuva Manch Dhuldev

Satara : दिव्यांगांच्‍या प्रगतीसाठी सर्वतोपरी मदत करू

दहिवडी : दिव्यांगांना आयुष्यात अडचणींचा सामना करण्यासाठी कृत्रिम उपकरणांची आवश्यकता असते. सर्वसामान्यांसारखी प्रगती करण्यासाठी त्यांना सर्वतोपरी मदत करू, अशी ग्वाही जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी दिले.

धुळदेव (ता. माण) येथील धुळोबा मंदिर येथे अनिलभाऊ देसाई युवा मंचच्या माध्यमातून आयोजित दिव्यांग मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे माण तालुकाप्रमुख नागेश खांडेकर, युवा नेते धैर्यशील कोळेकर, सचिन खांडेकर, नाथा शिंदे, धर्मा खांडेकर, मुंबई पोलिस मारुती खांडेकर, योगेश शिंदे आदी उपस्थित होते. 

श्री. देसाई म्हणाले, ‘‘एखाद्या अवयवात कमतरता असणे, हा त्या व्यक्तीचा दोष नसतो. मात्र, त्यांचे जीवन यशस्वी व समृद्ध होण्यासाठी त्यांना साहित्याची गरज असते. शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून दिव्यांगांच्या समस्या प्राधान्याने सोडविल्या जातील.’’

श्री. खांडेकर म्हणाले, ‘‘समाजामधील आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या व्यक्तींनी तसेच सर्व लोकप्रतिनिधींनी दिव्यांगांना आधार देण्यासाठी पुढे आले पाहिजे.’’ धैर्यशील कोळेकर म्हणाले, की दिव्यांगांची सेवा करण्यासाठी कटिबद्ध आहोत.

यावेळी दिव्यांगांना देसाई युवा मंचच्या वतीने तीन चाकी स्कूटर व दिव्यांग उपयोगी साहित्याचे वाटप केले. गणेश माने, आण्णा मगर, नाथा शिंदे, राजू गोरड आदींसह दिव्यांग बांधव, ग्रामस्थ उपस्थित होते.