esakal | Coronavirus : अँटिजेन चाचणी केलेल्यांपैकी निम्मे बाधित; कुंभारगावात एकच खळबळ

बोलून बातमी शोधा

Corona
Coronavirus : अँटिजेन चाचणी केलेल्यांपैकी निम्मे बाधित; कुंभारगावात एकच खळबळ
sakal_logo
By
राजेश पाटील

ढेबेवाडी (सातारा) : कुंभारगाव (पडवळवाडी, ता.पाटण) या छोट्याशा वाडीतील 16 जणांची आज आरोग्य विभागाने कोरोना चाचणी केली असता त्यातील आठ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली. खबरदारी म्हणून रुग्णांचे वास्तव्य असलेला परिसर सील करण्यात आला आहे. (Outbreaks Of Coronavirus Increased In Kumbhargaon Satara News)

कुंभारगाव विभागातील पडवळवाडी या छोट्याशा वाडीत अनेकजण ताप-सर्दीने आजारी असून, उपचारासाठी परिसरातील दवाखान्यात जात असल्याची माहिती पोलिस पाटील अमित शिंदे यांना समजल्यावर त्यांनी तळमावले प्राथमिक आरोग्य केंद्राला त्याबाबत कळविले. आरोग्य केंद्राच्या वतीने आज तेथे कोरोना चाचणी शिबिर घेण्यात आले. त्यामध्ये 16 जणांची अँटिजेन चाचणी केल्यावर चक्क आठ जण बाधित आढळल्याने खळबळ उडाली.

सैन्यातून सुटीवर आलेल्या जवानावर काळाचा घाला; राणंदात प्रशांतचा विहिरीत बुडून मृत्यू

खबरदारी म्हणून तातडीने तेथे प्रतिबंधित क्षेत्र तयार करून रुग्णांना औषधोपचार देत घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तपासणी शिबिरात वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश गोंजारी, आरोग्य कर्मचारी कांबळे, रोहित भोकरे, जे. एफ. पावरा, व्ही.जी. फाळके, स्वप्नील कांबळे, आशा स्वयंसेविका मनीषा शिंदे, पोलिस पाटील अमित शिंदे आदींनी सहभाग घेतला. गावात आणखी रुग्ण वाढू नयेत, यासाठी आवश्‍यक उपाययोजना हाती घेतल्याचे डॉ. गोंजारी यांनी सांगितले.

Outbreaks Of Coronavirus Increased In Kumbhargaon Satara News