
सिद्धार्थ लाटकर
सातारा : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागातील कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदार कारभारामुळे सातारा जिल्ह्यातील सुमारे ७५ पेक्षा अधिक खेळाडूंना त्यांच्या प्राविण्यानुसार ग्रेस गुण न मिळाल्याने इयत्ता दहावीतील त्यांच्या गुणांत फरक पडला आहे. यामुळे काही खेळाडूंचे त्यांच्या शाळेतील गुणवत्ता यादीमधील स्थान घसरले आहे. दरम्यान, याबाबत आज जिल्ह्यातील बहुतांश शाळांमधील क्रीडा शिक्षकांनी संताप व्यक्त करत जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयात धाव घेऊन संबंधित खेळाडूंना निर्धारित गुण मिळण्यासाठी आग्रह धरला. जिल्हा क्रीडाधिकारी नितीन तारळकर यांनी बोर्डाशी संपर्क साधत पाठपुरावा सुरू केला आहे.