
-सिद्धार्थ लाटकर
सातारा : महाराष्ट्र कौशल्य विकास सोसायटीचे दुर्लक्ष आणि शासन वेळेत पैस देत नसल्याने टर्नर, फिटर, वेल्डरपासून ते अगदी हॉटेल मॅनेजमेंट, ब्युटीपार्लर आदी कौशल्य विकास आधारित अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देणाऱ्या सातारा जिल्ह्यातील दीडशेपेक्षा अधिक संस्था आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत. यामुळेच सद्यःस्थितीत जिल्ह्यातील सुमारे २० ते ३० संस्थांना विद्यार्थी घडविण्याचे शिवधनुष्य पेलावे लागत आहे. जिल्ह्यातील कौशल्य विकास संस्थांचे सुमारे २०० कोटी रुपये थकीत असल्याने आगामी काळात वेळेत पैसे न मिळाल्यास या संस्थांनाही टाळे लागण्याची चिन्हे आहेत.