

MPSC Success Story: Vikram Padale Clears Exam Despite Father’s Demise
sakal
-विकांत बेलोशे
पाचगणी : ध्येय गाठण्यासाठी लागणारी प्रचंड जिद्द आणि संकटाच्या प्रसंगातही न डगमगता कर्तव्याला दिलेले प्राधान्य, याची प्रचिती रामवाडी (ता. जावळी) येथील विक्रम दत्तात्रय पाडळे याने दिली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत विक्रमने ‘‘टॅक्स असिस्टंट’’ (कर सहाय्यक) पदावर यश मिळवत राज्यामध्ये ४२ वी रँक प्राप्त केली आहे.