ऑक्‍सफर्डची कोरोनावरील लस दीडशे रुपयांत!

ऑक्‍सफर्डची कोरोनावरील लस दीडशे रुपयांत!

मायणी (जि. सातारा) : ऑक्‍सफर्डची लस 70 वर्षांवरील वृद्धांना कोरोना होण्यापासून 99 टक्के संरक्षण देणार असून, येत्या मार्चपर्यंत भारतात केवळ दीडशे रुपयात ती उपलब्ध होणार आहे, अशी दिलासादायक माहिती ऑक्‍सफर्ड युनिव्हर्सिटीमधील वरिष्ठ संशोधक, मायणीचे सुपुत्र डॉ. नानासाहेब थोरात यांनी दिली. 

ऑक्‍सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये संशोधित झालेली आणि एस्ट्रा झेनिका या कंपनीच्या साहाय्याने विकसित केलेली कोरोना-व्हायरस लस पहिला अर्धा डोस दिल्यानंतर 70 टक्के आणि 21 दिवसांनंतर दुसरा पूर्ण डोस दिल्यानंतर 90 टक्के परिणामकारक आहे. सुमारे 23 हजार निरोगी लोकांवर चाचणी केल्यानंतर आज एस्ट्रा झेनिका आणि ऑक्‍सफर्ड युनिव्हर्सिटीने संयुक्तपणे अधिकृत परिणामांची जाहीर घोषणा केली. याआधी फायझर या कंपनीची लस 90 टक्के, तर मॉडेर्ना कंपनीच्या लशीची परिणामकारकता 95 टक्के असल्याचे जाहीर झाले आहे. फायझर आणि मॉडेर्नाच्या एमआरएनए लसीसारखेच ऑक्‍सफोर्डची लस सुरवातीला अर्ध्या डोस आणि 21 दिवसांनंतर पूर्ण-डोस (याला बूस्टर डोस म्हणतात) दिल्यानंतर व्हायरसचे संक्रमण करतेय. ऑक्‍सफोर्डची लस ही एका विषाणूपासून बनविली आहे. जी सामान्य सर्दीच्या विषाणूची (एडेनोव्हायरस) कमकुवत आवृत्ती असून, अनुवांशिकरीत्या बदलली गेली आहे. जेणेकरून मनुष्याच्या शरीरात त्याची वाढ होणे अशक्‍य आहे. तसेच शरीरामध्ये त्याचे इतर दुष्परिणामसुद्धा होत नाहीत. 

ऑक्‍सफर्डची लस आणि इतर लशीमधील फरक
 
फायझर या कंपनीची लस ही उणे 70 अंश सेल्सिअस तापमानाला स्टोअर करावी लागते, तर मॉडेर्ना कंपनीची लस ही उणे वीस 20 अंश सेल्सिअस तापमानात स्टोअर करावी लागते. त्याउलट ऑक्‍सफर्डची लस मात्र धन दोन ते आठ अंश सेल्सिअस म्हणजेच आपल्या घरातील रेफ्रिजरेटरमधील तापमानालाही स्टोअर करता येते. फायझर कंपनीच्या लसीच्या एका डोसची किंमत सुमारे अडीच हजार रुपये ( 35 डॉलर), मॉडेर्नाच्या लसीच्या एका डोसची किंमत सुमारे दोन हजार सातशे रुपये (37 डॉलर), तर ऑक्‍सफर्डच्या एका डोसची किंमत केवळ दीडशे रुपये (दोन डॉलर) असेल. मार्च महिन्यापर्यंत भारतामध्ये ऑक्‍सफर्ड, फायझर व मॉडेर्नासह अन्य दोन तीन कंपनींच्या लशी उपलब्ध होतील. भारतामध्ये विकसित होत असलेल्या भारत बायोटेक कंपनीच्या लशीचे परिणाम अजून जाहीर झालेले नाहीत. 2021 च्या डिसेंबर महिन्यापर्यंत ऑक्‍सफर्डच्या लशीचे तीनशे कोटी डोस दिले जातील. ऑक्‍सफर्ड युनिव्हर्सिटीच्या "ना नफा, ना तोटा' या नियमानुसार ऑक्‍सफर्डची लस सर्व कंपन्यांना युरोपमध्ये आणि सिरम इन्स्टिट्यूट भारतमध्ये, तसेच इतर देशामध्ये कमीतकमी किमतीत उपलब्ध करून द्यावी लागेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ऑक्‍सफर्डची लस 70 वर्षांवरील वृद्ध व्यक्तींना कोरोना होण्यापासून 99 टक्के संरक्षण देतेय. 

कोणती लस कोणी विकसित केली आहे?
 
ऑक्‍सफर्डची लस सारा गिल्बर्ट आणि अँड्रू पोलार्ड या शास्त्रज्ञांनी मेडिकल सायन्स डिव्हिजनमध्ये विकसित केली असून, फायझर कंपनीची लस जर्मनीमध्ये उगर शाहीन आणि त्यांची पत्नी झलेम तुरेस यांनी युनिव्हर्सिटी ऑफ मनीझ बायोटेकमध्ये विकसित केली आहे, तर मॉडेर्ना कंपनीची लस अमेरिकेतील मॅच्युसेट्‌स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीमध्ये विकसित केली आहे. 

कळसूबाईचे उंच शिखर शिलेदारांकडून सर; व्यसनमुक्त युवक संघाची मोहीम फत्ते

साठ हजारांवर होणार चाचण्या 

ऑक्‍सफर्ड युनिव्हर्सिटीच्या माहितीनुसार पुढच्या टप्प्यात आणखी 60 हजार व्यक्तींसह कॅन्सर, डायबिटीज, हृदयरोग, कावीळ आदी विविध आजार असणाऱ्या रुग्णांवर चाचणी करून लशीची परिणामकारकता तपासली जाणार आहे. त्यामध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, जपान, अमेरिका, केनिया या देशांचा समावेश आहे. सध्या जगातील 10 देशांमध्ये ऑक्‍सफर्डच्या लशीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू आहे. लवकरच ऑक्‍सफर्ड युनिव्हर्सिटी आणि एस्ट्रा झेनिका मिळून तिसऱ्या अंतरिम चरणातील प्रभावी माहिती ब्रिटन सरकारच्या सुरक्षा नियामक एजन्सीकडे प्रस्तुत करतील. त्याचबरोबर इतर देशांतील ऑक्‍सफर्डच्या लशीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करणाऱ्या कंपन्या त्या- त्या देशांतील सरकारच्या सुरक्षा नियामक एजन्सीकडे प्रस्तुत करतील. 

ऑक्‍सफर्डची लस फेब्रुवारी 2020 मध्ये विकसित करायला सुरवात केली. पहिल्या टप्प्यातील (फेज-1) चाचणी एप्रिल 2020 पासून सुरू होऊन सध्या जगभरातील पंचवीसपेक्षा अधिक देशांत तिसऱ्या टप्प्यातील (फेज-3) चाचणी सुरू आहे. 
- डॉ. नानासाहेब थोरात (वरिष्ठ संशोधक ऑक्‍सफर्ड युनिव्हर्सिटी)

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com