

Oxford Admits Content Was Published Without Verification
Esakal
महाराष्ट्रात दोन दशकांपूर्वी जेम्स लेनच्या शिवाजी- हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया या पुस्तकावरून मोठा गदारोळ झाला होता. या पुस्तकात राजमाता जिजाऊसाहेब यांच्याबाबत वादग्रस्त मजकूर छापला होता. आता याच पुस्तकाचे प्रकाशक असलेल्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसनं जाहीर माफी मागितलीय. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस ही ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून चालवण्यात येते. २००३ मध्ये हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं होतं. यातील काही मजकुरावर आक्षेप घेण्यात आला होता. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीकडून उदयनराजे भोसले आणि महाराष्ट्रातील जनतेची माफी मागत जाहीर निवेदन प्रसिद्ध केलंय.