esakal | साताऱ्यात मृत्यूतांडव! जिल्ह्यात 24 तासात 58 बाधितांचा मृत्यू, तर 2376 जणांचे अहवाल Positive
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

साताऱ्यात मृत्यूतांडव! जिल्ह्यात 24 तासात 58 बाधितांचा मृत्यू, तर 2376 जणांचे अहवाल Positive

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : कोरोनाच्या (Coronavirus) पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत बाधितांचा आकडा वाढत चालला असून कोरोनामुळे मृत्यू (Corona Death) होणाऱ्यांची संख्या पाहून काळजाचा थरकाप उडत आहे. जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, 2376 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 58 बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. (Corona Test Positive Of 2376 Citizens In Satara District)

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आजअखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे : जावली 128 (5442), कराड 310 (17006), खंडाळा 183 (7058), खटाव 215 (9753), कोरेगांव 193 (9616), माण 151 (7288), महाबळेश्वर 27 (3432), पाटण 153 (4683), फलटण 410 (14783), सातारा 409 (25990), वाई 175 (8584 ) व इतर 22 (607) असे आजअखेर एकूण 114242 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ कऱ्हाडात भाजपचे आंदोलन

तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आजअखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे : जावली 0 (106), कराड 17 (469), खंडाळा 3 (88), खटाव 5 (278), कोरेगांव 5 (249), माण 4 (151), महाबळेश्वर 0 (34), पाटण 3 (123), फलटण 0 (194), सातारा 12 (793), वाई 9 (215) व इतर 0, असे आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण 2700 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Corona Test Positive Of 2376 Citizens In Satara District