
कोपर्डे हवेली: शेतकऱ्यांची मेहनत आणि इंद्रायणी तांदळाची ख्याती यामुळे भातशेतीच्या नकाशावर अग्रस्थानी असणाऱ्या येथील परिसरात यंदाच्या हंगामात मे महिन्यापासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली; परंतु सध्याच्या ऊन-पावसाच्या लपंडावामुळे भाताच्या तरव्यांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी, भाताची तरवे पिवळे पडले असून, त्यांची वाढ खुंटली आहे. यामुळे भात उत्पादक शेतकरी चिंतेत असून, रोपांची टंचाई जाणवण्याची शक्यता आहे.