
दहिवडी : खोकडे (ता. माण) येथील सुकन्या पल्लवी सुभाष सावंत हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतलेल्या परीक्षेतून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामध्ये सहायक अभियंता या पदाला गवसणी घातली आहे. तिचे इयत्ता पहिली ते तिसरीचे शिक्षण खोकडे येथे पुढील दहावीपर्यंतचे शिक्षण बिदाल येथे झाले.