पाचगणी- महाबळेश्वर रस्त्यावरील अपघातात एक ठार

रविकांत बेलोशे
Sunday, 18 October 2020

घटनेची माहिती मिळताच पाचगणी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सतीश पवार, वैभव भिलारे, नितीन कदम, संतोष कदम, अविनाश बाबर, विजय मुळे, सागर नेवसे यांच्यासह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.

भिलार (जि. सातारा) : पाचगणी- महाबळेश्वर रस्त्यावर मॅप्रो गार्डनच्या अलीकडच्या वळणावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला. एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.
 
पाचगणी पोलिस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी, की पाचगणी- महाबळेश्वर रस्त्यावर मॅप्रो गार्डनच्या अलीकडच्या वळणावर अंदाज न आल्याने मोटारसायकल व स्कूटरचा समोरासमोर अपघात झाला. यामध्ये अनिल लक्ष्मण सपकाळ हा जागेवरच मृत्युमुखी, तर ओंकार मोरे हा गंभीर जखमी झाला आहे. अनिल सपकाळ (वय 52 सध्या रा. मेटगुताड, ता. महाबळेश्वर मूळ रा. दह्याट, ता. वाई) हे आपल्या मोटारसायकलवरून पाचगणीच्या दिशेस येत होते. ओंकार मोरे (वय 24 रा. वाडाकुंभरोशी, ता. महाबळेश्वर) हा युवक आपल्या स्कूटरवरून महाबळेश्वर दिशेने जाताना दोन्ही दुचाकींचा पाचगणीपासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावर मॅप्रो गार्डनच्या अलीकडे असणाऱ्या वळणावर समोरासमोर अपघात झाला. यामध्ये अनिल सपकाळ यांचा जागीच मृत्यू झाला. ओंकार मोरे जखमी झाले.

अजित पवार फक्त नामधारीच उपमुख्यमंत्री, मदतीची अपेक्षा ठेवणाऱ्या शेतकऱ्यांची उपेक्षा

घटनेची माहिती मिळताच पाचगणी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सतीश पवार, वैभव भिलारे, नितीन कदम, संतोष कदम, अविनाश बाबर, विजय मुळे, सागर नेवसे यांच्यासह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमी युवकास तत्काळ उपचारार्थ सातारा येथे हलविण्यात आले. अपघाताची नोंद पाचगणी पोलिस ठाण्यात झाली असून, अधिक तपास सतीश पवार करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Panchgani Anil Sapkal Passes Away Satara News