पाचगणी : ज्येष्ठ नगरसेवक राष्ट्रवादीत दाखल; सत्ताधारी गटास धक्का | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाचगणी : ज्येष्ठ नगरसेवक राष्ट्रवादीत दाखल; सत्ताधारी गटास धक्का

पाचगणी येथील विश्रामगृहावर झालेल्या प्रवेश कार्यक्रमावेळी नारायण बिरामणे, विठ्ठल बगाडे, विजय कांबळे, नीता कासुर्डे, हेमा गोळे, रेखा जानकर, अर्पना कासुर्डे, सुमन गोळे, आशा बगाडे यांच्यासह मिलिंद कासुर्डे, शेखर कासुर्डे, प्रकाश गोळे, संतोष गोळे, संजय कासुर्डे, रुपेश बगाडे, शरद कासुर्डे आदी उपस्थित होते. 

पाचगणी : ज्येष्ठ नगरसेवक राष्ट्रवादीत दाखल; सत्ताधारी गटास धक्का

भिलार (जि. सातारा) : पाचगणी पालिकेतील सत्ताधारी गटाचे नगरसेवक दिलावर बागवान यांनी आमदार मकरंद पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस व घाटजाई शहर विकास आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला. यामुळे सत्ताधारी गटाला धक्का बसला असून, पाचगणीतील राजकीय गणिते बदलण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
 
गेली तीन दशके बागवान यांनी सत्ताधारी गटात राहणे पसंत केले होते. नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ख्याती होती; परंतु काही महिन्यांपासून बागवान आणि सत्ताधारी गटात काही कारणावरून तू तू मैं मैं सुरू होते. बागवान कधी सत्ताधारी गटात तरी कधी विरोधात दिसत होते; परंतु दोन महिन्यांपूर्वी 29 डिसेंबर 2020 रोजी झालेल्या बैठकीला बागवान हे अनुपस्थित राहून सत्ताधारी गटाला अडचणीत आणले होते. त्यामुळे याचा फायदा घेत विरोधकांनी बहुमताच्या जोरावर विविध ठराव फेटाळले; परंतु या वेळी बागवान यांनी मी लक्ष्मी कऱ्हाडकर यांच्याच गटात असल्याचे सांगितले होते. नक्की बागवान कुणाचे यावरून शहरात चर्चा सुरू होत्या.

‘भवानीदेवी’, ‘तलवार’ हे इतिहासातले शब्द आपल्याला सुपरिचित आहेत
 
अखेर बागवान यांनी आमदार पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. पाचगणी शहर विकास आघाडीतही त्यांनी प्रवेश केला. त्यामुळे सत्ताधारी गटाचे हक्काचे नगरसेवक विरोधात गेल्याने विरोधकांचे पारडे जड झाले आहे. सत्तधारी गटाला यामुळे जोरदार धक्का पोचला आहे.
 
पाचगणी येथील विश्रामगृहावर झालेल्या प्रवेश कार्यक्रमावेळी नारायण बिरामणे, विठ्ठल बगाडे, विजय कांबळे, नीता कासुर्डे, हेमा गोळे, रेखा जानकर, अर्पना कासुर्डे, सुमन गोळे, आशा बगाडे यांच्यासह मिलिंद कासुर्डे, शेखर कासुर्डे, प्रकाश गोळे, संतोष गोळे, संजय कासुर्डे, रुपेश बगाडे, शरद कासुर्डे आदी उपस्थित होते. 
दिलावर बागवान यांच्या ज्येष्ठत्वाचा फायदा पक्षाला होणार असून, त्यांना पक्षात सन्मानाची वागणूक दिली जाईल, असे आमदार पाटील यांनी सांगितले. दिलावर बागवान यांनी पाचगणीच्या विकासासाठी मी विरोधी गटात सहभागी झाल्याचे सांगितले. 

15 वर्षांपूर्वीचा विक्रम स्नेहा जाधवने ताेडला; हातोडाफेकमध्ये यश

कोरोनासोबत जगायला शिका म्हणणारे वारक-यांच्या प्रश्नावर मूग गिळून गप्प : अक्षयमहाराज भोसले 

पुणे- सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील शहरात अनिश्चित काळासाठी लाॅकडाउन; अत्यावश्‍यक सेवा मिळणार घरपोच 


Edited By : Siddharth Latkar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top