जिल्हाधिकारी शेखर सिंहंच्या प्रयत्नांना ठाकरे सरकारचे पाठबळ

जिल्हाधिकारी शेखर सिंहंच्या प्रयत्नांना ठाकरे सरकारचे पाठबळ

भिलार (जि. सातारा) : पाचगणी गिरिस्थान पालिका क्षेत्रास महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने  "ब' वर्ग पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले आहे. साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पाचगणी पालिका क्षेत्रास "ब' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याची शिफारस केली होती.
 
पाचगणी गिरिस्थान शहर व परिसर महाराष्ट्रातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण असून, पर्यटनासाठी प्रसिद्ध असे निसर्गरम्य स्थळ आहे. या पर्यटन स्थळावर दर वर्षी अंदाजे सहा ते सात लक्ष पर्यटक भेट देतात. याशिवाय दर वर्षी अंदाजे पाच हजार इतके विदेशी पर्यटक भेट देतात. जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ व शैक्षणिक केंद्र म्हणूनही प्रसिद्ध आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे 4378 फूट उंचीवर हे पर्यटनस्थळ आहे. या ठिकाणी आशिया खंडातील दुसरे महत्त्वाचे उंचावरचे अंदाजे 100 एकर क्षेत्रामध्ये असलेले टेबललॅंड हे पठार असून, त्यापैकी 20 एकर क्षेत्रातील 1.5 एकर क्षेत्रामध्ये तलाव आहे.

ठाकरे कुटुंबियांच्या आवडत्या हाॅलिडे डेस्टिनेंशनला मिळाला 'ब' वर्ग दर्जा

याशिवाय या पठारावर कोरीव लेनी आहेत. या पर्यटनस्थळाच्या परिसरात भौगोलिकदृष्ट्या उंचावरील कृष्णा नदीचे खोरे, धरण परिसर आणि निसर्ग सौंदर्य दिसणारे पारशी पॉइंट, स्वच्छ भारत पॉइंट इत्यादी ठिकाणे आहेत. याशिवाय या शहराचे तापमान प्रखर उन्हाळ्यामध्येसुद्धा 25 ते 30 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नसते.
 
जिल्हाधिकाऱ्यांनी पाचगणी पालिका क्षेत्रास "ब' वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याची शिफारस केली होती. त्यानुसार "ब' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. पर्यटनस्थळाचे राज्यस्तरीय महत्त्व, मोठ्या प्रमाणात भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या, ऐतिहासिक व भौगोलिक महत्त्व इत्यादी बाबी विचारात घेता पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या वतीने राज्यातील "ब' वर्ग पर्यटनस्थळ घोषित करण्यासाठी निश्‍चित केलेल्या निकष व कार्यपद्धतीनुसार सदर पर्यटनस्थळाची पर्यटन क्षमता विचारात घेता एक विशेष बाब म्हणून "ब' वर्ग पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. शासनाच्या या निर्णयाचे पाचगणीत स्वागत होत आहे. 

आंबेनळीच्या दरीत पडलेल्या नवी मुंबईतील युवकास महाबळेश्वर ट्रेकर्सने वाचविले 

पाचगणी गिरिस्थान पालिका क्षेत्रास "ब' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा दिल्याचे आम्ही स्वागत करतो. पर्यटन व सांस्कृतिक कार्यमंत्री आदित्य ठाकरे यांचे सहकार्य, मुख्याधिकारी, नगरसेवकांच्या पाठपुराव्यामुळे हे यश लाभले आहे. पाचगणीच्या विकासाच्या दृष्टीने ही महत्त्वाची बाब असून, आता निधीची कमतरता भासणार नाही असे मत नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर यांनी व्यक्त केले.

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com